State Doctors Strike : राज्यातील निवासी डॉक्टर ‘या’ दिवशी जाणार संपावर 

राज्य सरकारच्या सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांनी ७ फेब्रुवारीपासून सामूहिक रजा किंवा संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

0
Doctor's Strike
Doctor's Strike

नगर : राज्यातील निवासी डॉक्टर (Doctors) ७ फेब्रुवारीपासून संपावर जाणार (Strike) असल्याची माहिती समोर आली आहे. नियमित मानधनाचा अभाव, रुग्णालयांमध्ये ज्येष्ठ निवासी डॉक्टरांच्या निवासाची चांगली सोय नसणं, डॉक्टरांच्या वसतिगृहांची दयनीय अवस्था यांसह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारची सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांनी ७ फेब्रुवारीपासून सामूहिक रजा (Collective Leave) किंवा संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या सेंट्रल मार्डने यासंदर्भात वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना कळवले असल्याचे सेंट्रल मार्ड अध्यक्ष अभिजीत हेलगे यांनी सांगितले.

नक्की वाचा : कर रचनेत कोणताही बदल नाही; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा  

निवासी डॉक्टरांचा गेल्या अनेक दिवसांपासून संघर्ष (State Doctors Strike)

निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या सेंट्रल मार्डचे अध्यक्ष अभिजीत हेलगे यांनी निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. हेलगे म्हणाले की, निवासी डॉक्टरांनी पुकारलेल्या संपाबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना कळवले आहे. तसेच, डॉक्टरांच्या सर्व मागण्यांबाबतच पत्रकही वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांना देण्यात आलं आहे. आपण गेल्या अनेक दिवसांपासून निवासी डॉक्टरांच्या विविध मागणीसाठी संघर्ष करत आहोत. मात्र, याबाबत सरकारकडून फारशी सकारात्मक पावलं उचलण्यात आलेली नाहीत. अनेक अडचणी निवासी डॉक्टरांना सतावत आहेत, असंही अभिजीत हेलगे पुढे बोलताना म्हणाले आहेत.

अवश्य वाचा : सर्वसामान्यांना ३०० युनिट मोफत वीज मिळणार ;अर्थसंकल्पात घोषणा  

७ फेब्रुवारीपासून डॉक्टरांचा संपावर जाण्याचा निर्णय (State Doctors Strike)

या सर्व मागण्यांबाबत सेंट्रल मार्डने आतापर्यंत २८ वेळा पत्रव्यवहार केला आहे. मात्र यावर सरकारकडून नाममात्र तोंडी आश्वासन मिळाले आहे. या मागण्यांबाबत सरकारकडून शाब्दिक आश्वासन मिळाल्यानंतर गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात निवासी डॉक्टरांनी सामूहिक रजा आंदोलन मागे घेतले होते. मात्र आता मागण्या मान्य न झाल्यास ७ फेब्रुवारीपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे देखील डॉ. हेलगे यांनी सांगितले.

हेही पहा : अभिनेता सोनू सूदने पटकावला ‘चॅम्पियन्स ऑफ चेंज’ पुरस्कार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here