State Drama Competition : हास्यकल्लोळात रंगला ‘ती, तिचा दादला आणि मधला’

State Drama Competition : हास्यकल्लोळात रंगला 'ती, तिचा दादला आणि मधला'

0
State Drama Competition : हास्यकल्लोळात रंगला 'ती, तिचा दादला आणि मधला'

State Drama Competition : नगर : अहिल्यानगरमध्ये ६३व्या हौशी राज्यनाट्य स्पर्धेला (State Drama Competition) सुरुवात झाली आहे. त्यामुळे सायंकाळ होताच नगरकर रसिकांची पाऊले आपोआप सावेडी उपनगरातील माऊली सभागृहाच्या दिशेने वळत आहेत. या स्पर्धेत मंगळवारी (ता. २६) ‘ती तिचा दादला आणि मधला’ या नाटकाने (Drama) प्रेक्षकांना खळखळून हसवले. सहज सरळ कथानक व बहारदार अभिनयाच्या (Acting) जोरावर या नाटकाने प्रेक्षकांची मने जिंकली.

State Drama Competition : हास्यकल्लोळात रंगला 'ती, तिचा दादला आणि मधला'

नक्की वाचा : ‘देशात पेट्रोलऐवजी बायोइथेनॉलवर वाहने धावणार’-नितीन गडकरी

हे नाटक वात्सल्य प्रतिष्ठानने केले सादर

‘ती, तिचा दादला आणि मधला’ हे नाटक वात्सल्य प्रतिष्ठान, अहिल्यानगर या संस्थेने सादर केले. प्र. ल. मयेकर यांनी लिहिले असून नानाभाऊ मोरे यांनी अभिनय व दिग्दर्शन केले हे नाटक रसिकांच्या पसंतीला उतरले. पडदा उघडताच चंदन (अजय लाटे) आणि नीलम (पल्लवी दिवटे) यांच्या संवादाने नाटकाची सुरुवात होते. चंदन म्हणजेच नीलमचा पूर्वाश्रमीचा क्लासमेट हे दोघे नीलमच्या घरी रोज भेटत असतात. पेशाने ट्रक ड्रायव्हर असलेला नीलमचा नवरा जालिंदर शिंदे (मोनेश ढाळे) कामानिमित्त बाहेरगावी असल्यामुळे हे दोघे रोज चोरून भेटतात. एके दिवशी जालिंदर अचानक घरी येतो आणि त्यानंतर घरी उडालेली तारांबळ याभोवती नाटकाचे कथानक फिरत राहते.

State Drama Competition : हास्यकल्लोळात रंगला 'ती, तिचा दादला आणि मधला'

अवश्य वाचा : जिल्ह्यात मंत्रिपदासाठी कोणाची लागणार वर्णी?

नाटकात यांच्या प्रमुख भूमिका (State Drama Competition)

या नाटकात अजय लाटे, पल्लवी दिवटे व मोनेश ढाळे यांच्या प्रमुख भूमिका असल्या तरी भाव खाऊन गेले ते नाटकातील काका (नानाभाऊ मोरे) व मामा (शुभम घोडके). नाटकात काकांच्या प्रवेशानंतर कथानक वेग पकडते. बायकोला कायम धाकात ठेवणारा नवरा जालिंदर ही भूमिका सुरुवातीला आश्वासक वाटत असली तरी काका यांच्या प्रवेशानंतर त्यांच्या टायमिंगपुढे ते काहीसे फिके पडताना दिसले.

State Drama Competition : हास्यकल्लोळात रंगला 'ती, तिचा दादला आणि मधला'


चंदनचा बेरकी आणि स्त्रीलंपट काका चंदन आणि नीलमच्या प्रेमात स्वतःची पोळी भाजू पाहतो आणि त्यातून जालिंदरला संपवण्यासाठी आलेल्या मामाची म्हणजेच आ. ज काळशेकर या पात्राची एंट्री होते. या पात्राने नंतर उडवून दिलेली धमाल आणि अंगीक अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. महेश ढवळे यांनी रिक्षा चालक बाजीराव ही छोटीशी भूमिका उत्तमरित्या बजावली.
नाटकातील जालिंदरच्या घराचा दिवाणखाना शेवटपर्यंत तसाच आहे. मात्र, प्रसंगानुसार त्यात मोजके बदल करण्यात आले होते.

State Drama Competition : हास्यकल्लोळात रंगला 'ती, तिचा दादला आणि मधला'

कथानकातील जालिंदरच्या खुनाचा प्लॅन काका व चंदन तयार करत असताना प्रकाशयोजनेचा वापर अधिक प्रभावीपणे करता आला असता. मात्र, मामाला विजेचा धक्का बसताना वापरलेली प्रकाश योजना उत्तम होती. प्रकाश योजना गणेश लिमकर आणि सोहम दायमा यांनी सांभाळली. अनुरूप प्रकाशयोजना झाल्याने काही विनोदी प्रसंग प्रेक्षकांनी उचलून धरले. शैलेश देशमुख यांनी संगीताची जबाबदारी योग्य निभावली. नेपथ्य अंजना मोरे आणि रंगभूषा चंद्रकांत सैंदाणे यांनी केले. काका (नानाभाऊ मोरे) आणि मामा (शुभम घोडके) यांच्या वेशभूषेमुळे नाटकात जिवंतपणा आला. विनोदी नाटक असल्यामुळे अफलातून टायमिंग आणि त्याला तांत्रिक गोष्टींची मिळालेली योग्य साथ यामुळे प्रेक्षकांची मने जिंकण्यात नाटक यशस्वी ठरले.