State Drama Competition : अहिल्यानगर केंद्रावरील ६४ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेला बुधवारपासून सुरुवात

State Drama Competition : दि. १२ नोव्हेंबर पासून अहिल्यानगर केंद्रावरील ६४ व्या हौशी मराठी राज्य नाटय स्पर्धेला सुरुवात

0
State Drama Competition : दि. १२ नोव्हेंबर पासून अहिल्यानगर केंद्रावरील ६४ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेला सुरुवात
State Drama Competition : दि. १२ नोव्हेंबर पासून अहिल्यानगर केंद्रावरील ६४ व्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेला सुरुवात

State Drama Competition नगर : सांस्कृतिक कार्य विभाग सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र (Maharashtra) राज्य, मुंबई आयोजित ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा (State Drama Competition) (२०२५-२६) १२ नोव्हेंबर पासून अहिल्यानगर येथील माऊली सभागृह, सावेडी येथे सुरू होत आहे. प्राथमिक फेरीतील या स्पर्धेत १२ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान रोज संध्याकाळी ८ वाजता नाटकाचे प्रयोग सादर होणार आहेत.

नक्की वाचा : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा मानस : पालकमंत्री विखे

रोज संध्याकाळी ८ वाजता नाटकाचे प्रयोग सादर होणार

State Drama Competition : दि. १२ नोव्हेंबर पासून अहिल्यानगर केंद्रावरील ६४ व्या हौशी मराठी राज्य नाटय स्पर्धेला सुरुवात
State Drama Competition : दि. १२ नोव्हेंबर पासून अहिल्यानगर केंद्रावरील ६४ व्या हौशी मराठी राज्य नाटय स्पर्धेला सुरुवात

अवश्य वाचा : मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी; दोन संशयित ताब्यात

२३ नाट्यसंघांचा सहभाग (State Drama Competition)

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य नाट्य स्पर्धा पार पडणार असल्याचे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी नमूद केलेले आहे. या स्पर्धेमध्ये एकूण २३ संघांचा सहभाग असून अहिल्यानगर जिल्ह्यातील संघ या स्पर्धेत सहभागी होत आहेत. राज्य नाट्य स्पर्धेतील सर्व नाटकांसाठी तिकीट दर : र १५/- व १०/- हे नाममात्र शुल्क असून जास्तीत जास्त प्रेक्षकांनी उपस्थित राहावे आणि हौशी रंगकर्मींचा उत्साह वाढवावा असे आवाहन संचालक बिभीषण चवरे यांनी केलेले आहे.