State Excise Department : ५० लाखांच्या बिअर बाटल्यासहा ७२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत 

State Excise Department : ५० लाखांच्या बिअर बाटल्यासहा ७२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत 

0
State Excise Department : ५० लाखांच्या बिअर बाटल्यासहा ७२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत 
State Excise Department : ५० लाखांच्या बिअर बाटल्यासहा ७२ लाखांचा मुद्देमाल हस्तगत 

State Excise Department : नगर : राज्य उत्पादन शुल्क (State Excise Department)स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पोलिसांनी संयुक्त कारवाई करून घोडेगाव (ता. नेवासा) येथे विनापरवाना दारू वाहतूक करणारा कंटेनर पकडला. या कारवाईत 50 लाखांच्या बिअर बाटल्या व कंटेनर असा 72 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, याप्रकरणी तिघाजणांवर गुन्हा दाखल (Filed case) करण्यात आला आहे.

नक्की वाचा: ‘उद्धव ठाकरेंची घरात बसून कारभार करायची सवय सुटली नाही’- चंद्रशेखर बावनकुळे

विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने कारवाई

विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली उत्पादन शुल्ककडून अवैध दारूनिर्मिती, वाहतूक व विक्रीवर कारवाई केली जात आहे. घोडेगाव शिवारातून एका कंटेनरमध्ये दारूची वाहतूक सुरू असल्याची खबर उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रमोद सोनोने यांना मिळाली होती. त्यांनी केलेल्या सुचनांवरून पथकाने घोडेगाव शिवारात सापळा लावून संबंधित कंटेनर अडवला. यावेळी वाहनाची तपासणी केली असता त्यात बिअरचे बॉक्स आढळले.

महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल (State Excise Department)

तसेच वाहन चालकाने वाहतूक पास व इतर मुळ कागदपत्रे सादर केली नाहीत, त्याकडून प्राप्त वाहतूक पासाच्या दुय्यम प्रतीवरून असे दिसून आले की, वाहतूक पासावर नमुद भागाव्यतिरिक्त दुसर्‍या मार्गाने वाहतूक केली जात आहे, तसेच वाहतूक पासावरील नमूद वाहन चालक महादेव ढाकणे, या ऐवजी विनापरवानगी दुसरा इसम उध्दव आव्हाड हा वाहन चालवित असल्याचे दिसून आले. याबाबत ट्रान्सपोर्टर कृष्णा काथार यांचा बेजबादारपणा दिसून आल्याने संशयित आरोपी विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.