State Excise Department : विदेशी बनावट दारूचा पर्दाफाश; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

State Excise Department : विदेशी बनावट दारूचा पर्दाफाश; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

0
State Excise Department : विदेशी बनावट दारूचा पर्दाफाश; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
State Excise Department : विदेशी बनावट दारूचा पर्दाफाश; राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

State Excise Department : नगर : श्रीरामपूर तालुक्यात विदेशी बनावट दारूची (Fake foreign liquor) वाहतूक करणाऱ्या आरोपीला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या (State Excise Department) पथकाने ताब्यात घेतले आहे. दारूची तपासणी केली असता विदेशी दारू बनावट असल्याचे प्रथमदर्शी दिसून आले. संशयित आरोपीने वापरलेल्या बाटल्यांचा पुनर्वापर करुन त्यामध्ये बनावट व आरोग्यास अपायकारक मद्य भरुन त्यावर पुन्हा बनावट बुचे लावून त्याची अवैध विक्री (Illegal Sale) करत असल्याचा प्रकार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने समोर आणला आहे.

नक्की वाचा : नगर परिषदांचा प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा जाहीर

संशयित आरोपीस तीन दिवसांची पोलीस कोठडी

पोपट भास्कर पवार (रा. आशीर्वादनगर, काळे वस्तीजवळ, वार्ड नं.1, श्रीरामपूर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजार केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने, उपअधीक्षक प्रवीण कुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव विभागाचे निरीक्षक एस. एस. हांडे यांना मिळालेल्या माहितीनुसार शिरसगाव-श्रीरामपूर रस्त्यावर बनावट विदेशी मद्य वाहतूक केली जात असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस मुद्देमालासह ताब्यात घेतला.

अवश्य वाचा : संग्राम भंडारे महाराजांना संरक्षण द्या; भाजपच्या तिनही जिल्हाध्यक्षांची मागणी

एका लाख ४० हजारांचा ममुद्देमाल हस्तगत (State Excise Department)

त्याच्याकडून बनावट विदेशी दारू १८० मिली मापाच्या विविध कंपन्यांच्या १६९ बाटल्या, बनावट बुचे, मोकळ्या बाटल्या, व इतर साहित्यसह एका लाख ४० हजारांचा ममुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत श्रीरामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई निरीक्षक एस. एस. हांडे, ए.डी. देशमाने, दुय्यम निरीक्षक आर. बी. गायकवाड, के. एम. सुळे, सायली गावडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक एस. एस. गारळे, जवान प्रमिला कासार, यु. जी. काळे, एस. ए. बटुळे, ओ. बी. पालवे, नि. वाहन चालक एस. एम. कासुळे यांच्या पथकाने केला आहे.