State Excise Department | राज्य उत्पादन शुल्कची वांगदरी परिसरात अवैध गावठी दारूवर कारवाई

0

State Excise Department | श्रीगोंदा : अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात अवैध गावठी दारूच्या विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Department) आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे. भरारी पथक क्रमांक १ ने शुक्रवारी (ता. १३) वांगदरी, मदनेवाडी आणि डोंबाळवाडी परिसरातील ओढे व झुडपांच्या आडोशाला सुरू असलेल्या हातभट्ट्यांवर धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत सुमारे २२ हजार ८०० लीटर कच्चे रसायन आणि १ हजार ९२५ लीटर गावठी दारू असा एकूण १० लाख ५६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला.

हे वाचा – हर्षवर्धन सपकाळ यांचे भाजपला प्रत्युत्तर; संघ विचाराचे लोक इंग्रजांची गुलामी आणि हेरगिरी करत होते

पथकाने टाकले छापे

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, निरीक्षक सुरज कुसळे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने पहाटेच्या सुमारास मदनेवाडी आणि डोंबाळवाडी परिसरात सापळा रचला होता. या मोहिमेत पथकाने दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून मोठ्या प्रमाणावर साठा जप्त केला. यामध्ये दारू गाळण्यासाठी तयार करण्यात आलेले गुळमिश्रित रसायन आणि तयार गावठी दारूचा समावेश आहे. कारवाईची चाहूल लागताच आरोपींनी काटवनाचा फायदा घेत पळ काढला. संबंधितांवर राज्य उत्पादन शुल्क कायद्यांतर्गत दोन गुन्हे नोंदवण्यात आले असून, फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

अवश्य वाचा – हर्षवर्धन सपकाळ यांचे भाजपला प्रत्युत्तर; संघ विचाराचे लोक इंग्रजांची गुलामी आणि हेरगिरी करत होते

साहित्य घटनास्थळीच नष्ट

कारवाईदरम्यान जप्त केलेले रसायन व दारू साठवण्यासाठी वापरलेले बॅरल्स व इतर साहित्य घटनास्थळीच नष्ट करण्यात आले. जप्त केलेल्या २२ हजार ८०० लीटर रसायनाची बाजारातील किंमत आणि तयार दारू गृहीत धरता ही कारवाई या वर्षातील मोठी कारवाई मानली जात आहे.

हे पहा – डोळ्यांनी अंध असली तरी ‘ती’ देणार डोळस न्याय! थान्या नाथन नेमक्या कोण ?

ही धडक कारवाई राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक क्रमांक १ चे निरीक्षक सुरज कुसळे व दुय्यम निरीक्षक आनंद जावळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या पथकात कर्मचारी सुरज पवार, सिद्धांत गिरिगोसावी, प्रथमेश पंडित, पांडुरंग गदादे आणि महिला कर्मचारी अर्चना दहिफळे यांचा समावेश होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here