
(State Excise Duty) : नगर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने (State Excise Duty) अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्याचे विभाजन करून अहिल्यानगर व शिर्डी (Shirdi) असे दोन स्वतंत्र अधीक्षक कार्यालय निर्माण केली आहेत. शिर्डीच्या अधीक्षक पदी ऋषिकेश इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय शिर्डी कार्यालयासाठी १७ पदे मंजूर केली आहेत. निरीक्षक, दुय्यम निरीक्षकांच्या कार्यक्षेत्राच्या हद्दीची नव्याने आखणी करण्यात आली आहे.
शिर्डीमध्ये स्वतंत्र भरारी पथक
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्ह्यात आता दोन अधीक्षक असतील एक नगर व दुसरे शिर्डीमध्ये. नगरमध्ये सोनोणे यापूर्वीच अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. आता शिर्डी अधीक्षकपदी इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नगर कार्यालयाला अहिल्यानगर, जामखेड, कर्जत, श्रीगोंदे, पारनेर, पाथर्डी व शेवगाव हे तालुके जोडण्यात आली आहेत. तर शिर्डी कार्यालयाला नेवासे, श्रीरामपूर, कोपरगाव, राहाता, राहुरी, संगमनेर व अकोला हे सात तालुके जोडण्यात आली आहेत. याशिवाय शिर्डीमध्ये स्वतंत्र भरारी पथक नियुक्त केले जाणार आहे.
हे वाचा: सुप्रिया सुळेंचे होणारे जावई सारंग लखानी कोण?
या कार्यालयांचेही विभाजन (State Excise Duty)
अहिल्यानगरसह राज्यातील मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, नाशिक व नागपूर अशा सहा मोठी लोकसंख्या, मोठे भौगोलिक क्षेत्र, अनुज्ञप्तींची संख्या, क्षेत्रफळ, महसूल प्राप्तीचा विचार करून राज्य उत्पादन शुल्क कार्यालयांचे विभाजन करण्याचा निर्णय पूर्वीच घेतला होता. त्याची अंमलबजावणी आता सुरू झाली आहे.
नक्की पहा : पदभार स्वीकारताच सुनेत्रा पवार भावुक,पार्थ पवारही रडले


