State Govt : सात-बारा उताऱ्यावर आईचंही नाव दिसणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

State Govt : सात-बारा उताऱ्यावर आईचंही नाव दिसणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

0
State Govt
State Govt : सात-बारा उताऱ्यावर आईचंही नाव दिसणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय

State Govt : नगर : राज्य सरकारने (State Govt) सरकारी कागदपत्रांमध्ये महिलांच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता सातबाऱ्यावर (Satbara) अर्जदाराच्या नावानंतर त्याच्या आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय भूमी अभिलेख विभागाने (Bhumi Abhilekh Vibhag) घेतला आहे. त्यामुळे एक मे नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन खरेदी केल्यानंतर सातबाऱ्यावर अर्जदारासोबत आईच्या नावाचा समावेश होणार आहे. तसेच पूर्वीच्या व्यक्तीच्या नावासोबत आईच्या नावाचा समावेशाची येत्या सहा महिन्यांत अंमलबजावणी सुरू होणार आहे.

हे देखील वाचा : मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर; कोकण विभाग सर्वात अव्वल

संगणकप्रणाली प्रक्रिया राबविण्यास सुरू

राज्य सरकारच्या महिला व बालकल्याण विभागाने काही महिन्यांपूर्वी महिलांच्या नावाचा अर्थात आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. त्याच अनुषंगाने एक मे २०२४ नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन, सदनिका खरेदी केल्यास त्याच्या नावासह आईच्या नावाचा उल्लेख करण्यात येणार आहे. त्या संदर्भात आता संगणकप्रणाली राबविण्याची प्रक्रिया भूमी अभिलेख विभागामार्फत सुरू आहे.

अवश्य वाचा : कोलकाताची तिसऱ्यांदा ‘आयपीएल’च्या जेतेपदावर मोहोर; हैदराबादला नमवले

संगणकप्रणालीत बदल करण्यात येणार (State Govt)

‘एक मे २०२४ नंतर जन्माला आलेल्या व्यक्तीच्या जन्म नोंदणीवेळीच त्याच्या आईच्या नावाचा समावेश करण्यात येणार आहे. त्या व्यक्तीचे संपूर्ण रेकॉर्ड तयार व्हायला काही वर्षांचा कालावधी जातो. सध्याच्या व्यक्तींच्या नावासोबत आईच्या नावाचा समावेश करता येईल; परंतु त्यासाठी आईच्या नावाचा नवा रकाना (कॉलम) तयार करण्यात येणार आहे. त्याबाबत संगणकप्रणालीत तसे बदल करण्यात येणार आहेत. त्या प्रक्रियेला तीन ते सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या पाच ते सहा महिन्यांत जुन्या व्यक्तींच्या नावासोबत आईच्या नावाचा उल्लेख करणे शक्य होणार आहे. त्यासाठी संबंधित व्यक्तीला ती महिला त्याची आई असल्याचा पुरावा द्यावा लागणार आहे. त्यानंतर त्या व्यक्तीच्या नावासोबत आईचे नाव लावले जाईल. त्या संदर्भातील पुरावे दाखल केल्यानंतर तलाठ्यामार्फत शहानिशा करून नोंद होणार आहे,’ असे ई-फेरफार प्रकल्पाच्या संचालिका सरिता नरके यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here