State Govt : नगर : देशातील देशी गायींचे भारतीय संस्कृतीत (Indian culture) वैदिक काळापासून असलेले स्थान, देशी गायींच्या (Native cows) शेण आणि गोमुत्राचे सेंद्रिय शेती पद्धतीत असलेले महत्त्वाचे स्थान विचारात घेऊन गोमातेसाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. देशी गायींना यापुढे ‘राज्यमाता- गोमाता’ म्हणून घोषित करण्यास आज राज्य शासनाने (State Govt) मान्यता दिली आहे.
नक्की वाचा: मतदानाचा दिवशी ज्या संस्था सुट्टी देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईचे निवडणूक आयुक्तांचे आदेश
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक
राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात पार पडली. त्यामध्ये विविध खात्यांसह एकूण ३८ निर्णय घेण्यात आले आहेत. प्राचीन काळापासून मानवाच्या दैनंदिन जीवनामध्ये गायीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. वैदिक काळापासून गायीचे धार्मिक, वैज्ञानिक आणि आर्थिक महत्त्व विचारात घेऊन त्यांना ‘कामधेनू’ असे संबोधण्यात आले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देशी जातींच्या गायी आढळतात.
अवश्य वाचा: मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात’या’जिल्ह्यांना यलो अलर्ट,हवामान विभागाचा अंदाज
देशी गायींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट (State Govt)
दिवसेंदिवस देशी गायींच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. देशी गायीच्या दुधाचे मानवी आहारात पौष्टीकदृष्ट्या अधिक मूल्य आहे. देशी गायींच्या दुधात मानवी शरीर पोषणासाठी महत्त्वाचे अन्नघटक उपलब्ध असल्याने ते पूर्णअन्न आहे. देशी गायींच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत आहे. उपरोक्त पार्श्वभुमी विचारात घेऊन, पशुपालकांना देशी गायींचे पालनपोषण करण्यास प्रेरित करण्याच्या दृष्टीने देशी गायीस ‘राज्यमाता- गोमाता’ घोषित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने आज हा निर्णय घेण्यात आला आहे.