
State Level Basketball Tournament : नगर : शहरातील उदयोन्मुख खेळाडू कार्तिक रत्नेश मिश्रा (Kartik Ratnesh Mishra) याने पुन्हा एकदा आपल्या कामगिरीची छाप पाडली आहे. नागपूर येथे नुकत्याच झालेल्या ७५ व्या वरिष्ठ राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत (State Level Basketball Tournament) पुणे जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनच्या (Poona District Basketball Association) संघाने विजेतेपदाचा मान पटकावत या विजयात कार्तिकने महत्त्वाची भूमिका बजावली.
अवश्य वाचा : अखेर नरभक्षक बिबट्या जेरबंद; वनविभागाची कारवाई
आईस हॉकी आणि स्पीड स्केटिंग मध्येही उल्लेखनीय कामगिरी
ही ऐतिहासिक कामगिरी टीम इंडियाचे माजी खेळाडू सिद्धांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विजय संपादन केला. कार्तिक मिश्राने आपल्या वेगवान खेळी, चपळ बचाव आणि निर्णायक क्षणी केलेल्या गुणांसह संघाच्या विजयासाठी मोठे योगदान दिले आहे. कार्तिक मिश्रा हा केवळ बास्केटबॉलपुरता मर्यादित नसून, आईस हॉकी स्केटिंग आणि स्पीड स्केटिंग या क्रीडाप्रकारातही त्याने देशासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
नक्की वाचा : कारमधून तब्बल एक कोटीची रोकड जप्त; संगमनेरमध्ये मोठी कारवाई
कार्तिकचा क्रीडा प्रवास प्रेरणादायी (State Level Basketball Tournament)
त्याने “खेलो इंडिया” स्पर्धेत आईस हॉकी स्केटिंग प्रकारात आपली चुणूक दाखवली होती. याचबरोबर, दुबई येथे झालेल्या साऊथ एशियन गेम्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत स्केटिंगमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. कार्तिक मिश्रा हा ऑक्झिलियम कॉन्व्हेंट स्कूल व पॉलीटेक्निकचा माजी विद्यार्थी असून, सध्या तो भारती विद्यापीठ, पुणे येथे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहे. कार्तिकचा क्रीडा प्रवास प्रेरणादायी आहे. त्याची आई अनुराधा मिश्रा यांनी राष्ट्रीय पातळीवरील पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत पदक पटकावून शहराचे नाव उंचावले आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


