Stone Crusher : पळवे बुद्रुक येथील खडी क्रेशरला ग्रामस्थांचा विरोध; सामूहिक उपोषणाचा इशारा

Stone Crusher : पळवे बुद्रुक येथील खडी क्रेशरला ग्रामस्थांचा विरोध; सामूहिक उपोषणाचा इशारा

0
Stone Crusher : पळवे बुद्रुक येथील खडी क्रेशरला ग्रामस्थांचा विरोध; सामूहिक उपोषणाचा इशारा
Stone Crusher : पळवे बुद्रुक येथील खडी क्रेशरला ग्रामस्थांचा विरोध; सामूहिक उपोषणाचा इशारा

Stone Crusher : पारनेर : तालुक्यातील पळवे बुद्रुक येथील प्रस्तावित असलेल्या ‘डी.के.टी. स्टोन क्रेशर (Stone Crusher)‘ या प्रकल्पामुळे स्थानिक शेतकरी आणि पर्यावरणाचे (Environment) मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. या प्रकल्पास पळवे बुद्रुक आणि कळमकरवाडी येथील ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. प्रशासनाने हा प्रकल्प तात्काळ रद्द न केल्यास १५ दिवसांनंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (District Collector’s Office) सामूहिक उपोषण करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. या बाबत पारनेरच्या तहसीलदार गायत्री सैंदाणे यांना निवेदन देण्यात आले आहे. ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ज्या जागेमध्ये हा क्रेशर प्रकल्प नियोजित आहे, ती जागा पळवे हद्दीत असली तरी प्रत्यक्षात कळमकरवाडी या महसुली गावाच्या अगदी जवळ आहे. या भागात शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी असून मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. खडी क्रेशरमधून निघणाऱ्या धुळीमुळे पिकांचे नुकसान होईल आणि परिसरातील जैवविविधतेवर विपरीत परिणाम होईल. 

नक्की वाचा : सार्वजनिक ठिकाणी दंगा केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

वन्यजीवांच्या अधिवासाला धक्का बसण्याची शक्यता

नियोजित प्रकल्पाच्या लगतच वनक्षेत्र असल्याने वन्यजीवांच्या अधिवासाला धक्का बसण्याची शक्यता आहे. प्रकल्पाच्या जवळच फटाका साठवणुकीचे गोडाऊन आहे. खडी क्रेशरच्या कामामुळे किंवा स्फोटकांमुळे भविष्यात येथे मोठी जीवित अथवा वित्तहानी होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. क्रेशरमुळे होणारे ध्वनी आणि वायू प्रदूषण स्थानिक रहिवाशांच्या आरोग्यासाठी घातक ठरणार आहे. “आमच्या हक्काच्या जमिनी आणि निसर्गाचे रक्षण करण्यासाठी आम्ही हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही,” अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे. प्रशासनाने या तक्रारीची वेळीच दखल घेऊन सदर प्रकल्प रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, जर १५ दिवसांच्या आत यावर योग्य कार्यवाही झाली नाही, तर बाधित शेतकरी आणि ग्रामस्थ प्रशासकीय कार्यालयासमोर बेमुदत सामूहिक उपोषणास बसतील.

अवश्य वाचा : शिवजयंती उत्सवानिमित्त पर्यावरण जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन; शेकडो शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग

निवेदनावर यांच्या स्वाक्षऱ्या (Stone Crusher)

या निवेदनावर विक्रमसिंह कळमकर, पांडुरंग आबासाहेब जाधव, संजय मच्छिंद्र औटी, संजय बाबुराव कळमकर, आप्पासाहेब कळमकर, प्रशांत भाऊसाहेब कळमकर, बाळासाहेब सावळेराम पवार, किसनराव जाधव, प्रल्हाद महादू जाधव, सुभाष किसन साबळे, देविदास रामदास कळमकर, विनायक बापू कळमकर, किरण सुभाष कळमकर संतोष दादाभाऊ कळमकर, विष्णू कळमकर, सबाजी दादाभाऊ कळमकर, श्रीकृष्ण ताबाजी कळमकर, राहुल नंदू कळमकर, हौशीराम बापू कळमकर, शिवाजी सूर्यभान कळमकर, जयसिंग तुकाराम कळमकर, विनायक भाऊसाहेब कळमकर, शंभू दादाभाऊ कळमकर, रोहित रामदास कळमकर, विजय गुलाब कळमकर, वैभव रघुनाथ कळमकर, बाळू तबाजी औटी, सुनील भाऊसाहेब कळमकर, प्रमोद भागचंद कळमकर, सुशील साहेबराव कळमकर, गणेश बाळू कळमकर, नानाभाऊ दगडू कळमकर, संदीप मच्छिंद्र जाधव आणि जालिंदर ज्ञानदेव कळमकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.