Surat Stone Pelting:सूरतमध्ये गणेशोत्सवाला गालबोट,गणपती मंडपावर दगडफेक

0
Surat Stone Pelting:सूरतमध्ये गणेशोत्सवाला गालबोट,गणपती मंडपावर दगडफेक

Surat Stone Pelting : देशभरात गणेशोत्सव (Ganeshotsav) मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा होत आहे. लाडक्या गणपती बाप्पाच्या भक्तीत नागरिक तल्लीन झाले आहेत. मात्र असं असताना गुजरातमधील सूरतमध्ये (Surat) या उत्सवाला गालबोट लागले आहे. सूरतमध्ये गणेशोत्सवादरम्यान दगडफेकीची (Stone Throwing) घटना घडल्याचं समोर आले आहे. सूरतमधील सैयदपुरा भागात काही समाजकंटकांनी गणपती मंडपावर दगडफेक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. संतप्त गणेशभक्तांनी पोलीस स्टेशनला घेराव घालत कारवाईची मागणी केली आहे.

नक्की वाचा : चष्म्यापासून मिळणार मुक्ती! नवीन ‘प्रेस्वू आयड्रॉप्स’ला केंद्राची मंजुरी

सुरतमध्ये गणपती मंडपावर दगडफेक (Surat Stone Pelting)

मिळालेल्या माहितीनुसार, गणपती मंडपावर दगडफेक झाल्यानंतर नागरिकांचा राग अनावर झाला होता.आक्रोशात असणाऱ्या लोकांनी सैयदपुरा पोलीस चौकीला घेराव घातला. लोकांना शांत करण्यासाठी तेथील  स्थानिक आमदार कांती बलर घटनास्थळी पोहोचले होते. आरोपींना सोडलं जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. त्यानंतर लोकांचा राग शांत झाला. पोलिसांनीही तात्काळ कारवाई करत सहा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

अवश्य वाचा : ‘जो हिंदू हित की बात करेगा,वही देश पर राज करेगा’;’धर्मवीर-२’चा नवा ट्रेलर प्रदर्शित

पोलिसांकडून जमावावर लाठीचार्ज(Surat Stone Pelting)

या दगडफेकीनंतर सूरतमधील लोक उग्र झाले होते. त्यांना शांत करण्याचा पोलिसांनी पुरेपूर प्रयत्न केला. गर्दी हाताबाहेर जात असल्याचं दिसताच पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. त्याशिवाय अश्रुधुराचा वापर करण्यात आला. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना गुजरातचे गृहमंत्री हर्ष सांघवी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, घटनेचं सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ व्हिजुअल्स, ड्रोन व्हिजुअल्स आणि अन्य साहित्याची पडताळणी केली जात आहे. सर्व आरोपींच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येईल. पोलिसांकडून दगडफेक करणाऱ्यांचा तपास केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here