काेड रेड
Stormy Rain : नगर : नगरसह राज्यातील विविध जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पुढील तीन तासांत वादळी पाऊस (Stormy Rain) हाेणार आहे, असा इशारा हवामान तज्ज्ञांकडून (Meteorologist) देण्यात आला आहे. त्यामुळे विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, आपत्तीच्या सूचनांचे काटेकाेर पालन करावे (Follow the instructions), असे आवाहन हवामान तज्ज्ञांकडून करण्यात आले आहे.
हे देखील वाचा: नीलेश लंकेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राहुल गांधी येणार
सूचनांचे काटेकाेर पालन करावे
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील तीन तासांत विजांच्या कडकडाटासह वादळी वारा व हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस हाेणार आहे. या कालावधीत शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.
नक्की वाचा: नगर लाेकसभेसाठी पहिल्याच दिवशी २३ उमेदवारांनी नेले ४२ अर्ज
या जिल्ह्यांमध्येही होणार पाऊस (Stormy Rain)
वादळी वारा, मेघगर्जनेसह विजा पडून पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. हवामान तज्ज्ञांनुसार अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे, धाराशिव, लातूर, नांदेड आदी जिल्ह्यात पाऊस हाेणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.