Stormy Rain : संगमनेर : तालुक्यातील आश्वी परिसरात शुक्रवारी (ता. ३ ) सायंकाळी अचानक आलेल्या वादळी पावसासह (Stormy rain) झालेल्या भीषण वीजपाताने (power outage) सोनवणे वस्तीवरील एका घराचे मोठे नुकसान (Major damage to the house) झाले. सुदैवाने, या संकटातून घरातील सदस्य सुखरूप बचावल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.
नक्की वाचा : ‘मुंबईत बॉम्बस्फोट होणार’ अशी खोटी माहिती पोलिसांना देणाऱ्या पारनेरच्या तरुणावर गुन्हा दाखल
सोलर वॉटर हीटर जळून खाक
मिळालेल्या माहितीनुसार, प्रवरा बँकेचे सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक प्रकाश सोनवणे यांच्या घरावर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास थेट वीज कोसळली. पावसाला सुरुवात झालेली असतानाच अचानक कानठळ्या बसवणारा आवाज आला आणि मोठा धक्का जाणवल्याने घरातील सदस्य भयभीत झाले. घराच्या स्लॅबवर बसवलेला सोलर वॉटर हीटर या विजेच्या तडाख्यात अक्षरशः जळून खाक झाला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
इमारतीच्या स्लॅबला मोठे तडे (Stormy Rain)
विजेचा प्रहार इतका तीव्र होता की, सोलर सेट पूर्णपणे निकामी झाला असून त्याच्या काचा घराच्या परिसरात विखुरल्या गेल्या. तसेच, इमारतीच्या स्लॅबलाही मोठे तडे गेले आहेत. ज्या खोलीच्या वर वीज पडली, तिथेच कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. “घर स्लॅबचे असल्याने बचावलो, जर पत्र्याचे असते तर मोठा अनर्थ घडला असता,” अशी भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली. या प्रसंगानंतर सौ. शोभना सोनवणे यांनी “नशीब बलवत्तर म्हणून आम्ही वाचलो” अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.
पंचनामे कराण्याची मागणी
गेल्या चार दिवसांपासून आश्वी परिसरात दुपारनंतर पावसासह विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहत आहेत. या अवकाळी संकटामुळे हाताशी आलेल्या गहू व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे. प्रशासनाने या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत, अशी मागणी परिसरातून होत आहे.



