Stormy Rain : हवामान विभागाचा अलर्ट; जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस वादळी पाऊस

Stormy Rain : हवामान विभागाचा अलर्ट; जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस वादळी पाऊस

0
Stormy Rain
Stormy Rain : हवामान विभागाचा अलर्ट; जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस वादळी पाऊस

काेड रेड————–

Stormy Rain : नगर : नगर जिल्ह्यात १३ ते १७ मे राेजी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस (Stormy Rain) बरसणार आहे, असा इशारा भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) दिला आहे. त्यामुळे विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, आपत्तीच्या (Disaster) सूचनांचे काटेकाेर पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हे देखील वाचा: आमदार प्रा राम शिंदे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार १३ ते १७ मे राेजी विजांच्या कडकडाटासह वादळी वारा व हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस हाेणार आहे. या कालावधीत शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा, जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. वादळी वारा, मेघगर्जनेसह विजा पडणे व जाेरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा.

नक्की वाचा: पारनेरमध्ये वीज पडून आठ शेळ्या दगावल्या

सुरक्ष‍ित ठिकाणी आश्रय घ्यावा (Stormy Rain)

नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. धाेकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये, मेघगर्जना होत असताना झाडांच्या खाली न थांबता सुरक्ष‍ित ठिकाणी आश्रय घ्यावा. नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस ठाण्याशी अथवा दूरध्वनी क्र. १०७७ (टोल फ्री) वर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here