Stormy Winds : वादळी वाऱ्याने कोळगाव परिसरातील अनेक संसार आले उघड्यावर

Stormy Winds : वादळी वाऱ्याने कोळगाव परिसरातील अनेक संसार आले उघड्यावर

0
Stormy Winds
Stormy Winds : वादळी वाऱ्याने कोळगाव परिसरातील अनेक संसार आले उघड्यावर

Stormy Winds : श्रीगोंदा : तालुक्यातील कोळगाव परिसरात मागील दोन दिवसात झालेल्या वादळी वाऱ्यासह (Stormy Winds) अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे, महावितरणचे (Mahavitaran) खांब उन्मळून पडले आहेत. तर कोळगाव परिसरातील अनेकांच्या घराचे पत्रे उडून गेल्याने संसार उघड्यावर आले आहेत. यात प्रशांत गुंजाळ या तरुणाच्या अंगावर घराची भिंत पडल्याने तो जखमी झाला आहे.

Stormy Winds
Stormy Winds : वादळी वाऱ्याने कोळगाव परिसरातील अनेक संसार आले उघड्यावर

नक्की वाचा: दरोड्याचा प्लॅन फसला; तिघे जेरबंद

अवकाळी पावसाने मोठे नुकसान

कोळगाव परिसरात रविवारी (ता.१९) व सोमवारी (ता.२०) सलग दोन दिवस झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसात गुंजाळ मळा, जगताप मळा, बेंदवस्ती, मानमोडी, तनपिरे मळा, वाघेरखेलवाडी परिसरातील बिठाबाई साबळे, अनिल काळे, वैभव नलगे, नंदू शामराव लगड, गणेश शाहजी निंबाळकर, संतोष गुरव, हरी दत्तात्रय गुंजाळ, विलास गुंजाळ, बाळासाहेब गुंजाळ, विजय गुंजाळ, विठ्ठल गुंजाळ, बापू गुंजाळ, संभाजी गुंजाळ, कैलास गुंजाळ, राजू गुंजाळ, मोहन जगताप यांच्या घराचे पत्रे उडून गेले. तर शरद धोत्रे आणि बापू दत्तात्रय गुंजाळ यांच्या घराचे पत्रे उडून जात घराची भिंत पडली. यात बापू गुंजाळ यांचा मुलगा प्रशांत गुंजाळ या तरुणाच्या अंगावर घराची भिंत पडल्याने तो जखमी झाला आहे.

Stormy Winds
Stormy Winds : वादळी वाऱ्याने कोळगाव परिसरातील अनेक संसार आले उघड्यावर

हे देखील वाचा: कन्हैया कुमार यांच्यावर दिल्लीत हल्ला; हार घालण्याच्या बहाण्याने कानशिलात लगावली

बहुतांश पिके जमीनदोस्त (Stormy Winds)

जोरदार वादळी वाऱ्यात घराचे पत्रे उडून गेल्याने घरातील अन्न-धान्य भिजून मोठे नुकसान होऊन अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. यात जोरदार वाऱ्यामुळे काही ठिकाणी महावितरणचे खांब उन्मळून पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला. तर कोळगाव परिसरातील पांडुरंग मेहेत्रे यांच्या शेततळ्याचा कागद फाटल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. तर माजी उपसरपंच अमित लगड यांच्या हॉटेलचा रस्त्याच्या कडेला असलेल्या एलईडी बोर्ड जोरदार वाऱ्यामुळे जमीनदोस्त होऊन मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे बहुतांश पिके जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here