Storytelling Competition : नगर : संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान, मुंबई (Mumbai) यांनी नैतिक शिक्षा योजना अंतर्गत आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धा २०२४ (Storytelling Competition) मध्ये सावेडीतील आशा एज्युकेशन फाउंडेशन (Asha Education Foundation) संचलित, जय बजरंग प्राथमिक विभागाचा सिद्धेश अमोल क्षीरसागर याने (इयत्ता ४थी ते ६ वी गटात) कथाकथन स्पर्धेत प्रथम क्रमांक तर पियुष बाळासाहेब उबाळे याने (उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक)मिळवला. स्पर्धेत विद्यालयातील विद्यार्थी सोहम पालवे व कृष्णा मेहेत्रे यांनी सहभाग प्रमाणपत्र मिळवले.
नक्की वाचा : लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार की नाही?आदिती तटकरेंच महत्वाचं विधान
जिल्ह्यातून या गटात अनेक स्पर्धक सहभागी
स्पर्धेत ठरवून दिलेल्या आध्यात्मिक विषयांमध्ये नियमित वेळेत कथाकथन सादर करायचे होते. या स्पर्धेचे परीक्षक म्हणून नाट्य कलाकार व समीक्षक अनिकेत देऊळगावकर, दीपा जानवे, बेलेकर मॅडम, रजनी ढोरजे, सविता धर्माधिकारी, प्रिया जानवे, मीरा बेलेकर यांनी काम पाहिले, तर संघटनेच्या नगर शहराच्या मुख्य कार्यवाहक आशा देशपांडे, पल्लवी जोशी, कल्पना गोगटे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.
नरेंद्र फिरोदिया यांनी विद्यार्थ्यांचे केले अभिनंदन
या यशस्वी विद्यार्थ्यांचे आशा एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच सहसचिव उमेश गांधी, व्यवस्थापक आशुतोष घाणेकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक अमोल क्षीरसागर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना व मार्गदर्शक शिक्षक, शिक्षिका आशा घुले, अश्विनी बेरड, गणेश शिंदे यांना शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.