Stray Dogs : पिसाळलेल्या कुत्र्याने १३ जणांना घेतला चावा; कर्जतच्या डायनॅमिक शाळेतील प्रकार

Stray Dogs : पिसाळलेल्या कुत्र्याने १३ जणांना घेतला चावा; कर्जतच्या डायनॅमिक शाळेतील प्रकार

0
Stray Dogs : पिसाळलेल्या कुत्र्याने १३ जणांना घेतला चावा; कर्जतच्या डायनॅमिक शाळेतील प्रकार
Stray Dogs : पिसाळलेल्या कुत्र्याने १३ जणांना घेतला चावा; कर्जतच्या डायनॅमिक शाळेतील प्रकार

Stray Dogs : कर्जत: कर्जत येथील डायनॅमिक इंग्लिश स्कुलच्या (dynamic english school) आवारात एका भटक्या कुत्र्याने (Stray Dogs) तब्बल १३ जणांना चावा घेत काही काळ शाळेत भीतीचे वातावरण निर्माण केल्याने विद्यार्थ्यांची चांगलीच धावपळ उडाली होती. अखेर काही वाहन-चालक आणि शाळेतील शिक्षकांनी त्यास पिटाळून लावले. जखमी विद्यार्थ्यांना (Injured students) जिल्हा उपरुग्णालयात दाखल करीत त्यांच्यावर उपचार करण्यात आले. मोकाट कुत्र्याने कर्जत शहरात उच्छाद मांडला असून त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.

नक्की वाचा: श्रीगोंदा तालुक्यातील लोखंडेवाडी येथील जिल्हा परिषद शाळा कोसळली; सुदैवाने जीवितहानी टळली

जखमी विद्यार्थी रुग्णालयात दाखल

शुक्रवारी (ता.३०) दुपारच्या सुमारास डायनॅमिक इंग्लिश स्कुलच्या आवारात विद्यार्थी खेळत असताना अचानक एका भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने प्रवेश करीत शाळेतील मुलांना तसेच शाळेच्या वाहनांवर असणारे चालक आणि कर्मचारी असे एकूण १३ जणांना चावा घेतला असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाने दिली. तब्बल १५ ते २० मिनिटे त्या पिसाळलेल्या कुत्र्याने शाळेच्या आवारात उच्छाद मांडत हैदोस घातला. अखेर शिक्षक आणि शाळेच्या वाहनचालकांनी हातात लाकडी दंडुका घेत त्यास पिटाळून लावले. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल त्यांच्यावर डॉ. विष्णू हंगे, सिस्टर दीक्षा कोळेकर, ब्रदर सागर लांगोरे यांनी उपचार केले.

अवश्य वाचा: राष्ट्रवादीच्या प्रमुख तीन नेत्यांच्या वर्षावर जाण्याने हालचालींना वेग

भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी (Stray Dogs)

सदरची बाब पालकांना समजताच शालेय परिसरात आणि रुग्णालयात धाव घेत आपले पाल्यांची विचारपूस करीत खबरदारी घेण्याची विनंती पालकांनी शाळा प्रशासनास केली. शहरातील अनेक भागात मोकाट कुत्र्याचा मोठा प्रमाणात वावर दिसून येतो. झुंडीने वावरणारे कुत्र्याचे कळप वाटसरू यासह विद्यार्थ्यांवर अचानक अंगावर धाव घेत असल्याने अनेकदा अपघात देखील घडले आहे. त्यामुळे भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी पालकांनी प्रशासनास केली आहे.