Street Robbery : रस्ता लूट करणारा आरोपी जेरबंद; ८० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

Street Robbery

0
Street Robbery : रस्ता लूट करणारा आरोपी जेरबंद; ८० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
Street Robbery : रस्ता लूट करणारा आरोपी जेरबंद; ८० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

Street Robbery : कर्जत : मिरजगाव शिवारात ट्क ट्रेलरला चारचाकी वाहन आडवे लावत ट्रेलरमधील ट्रान्सपोर्टचे सोलर Solar प्लेटा चोरून नेणाऱ्या (Street Robbery) आरोपीस मिरजगाव पोलीसांनी (Police) अटक करून सुमारे ८० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. रणजित अरूण जाधव (वय २४, बंडी शेगाव, ता.पंढरपूर, जिल्हा सोलापूर) असे जेरबंद आरोपीचे (Accused) नाव आहे. 

नक्की वाचा: सर्व मागण्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय मागे हटणार नाही : मनोज जरांगे पाटील

मिरजगाव पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ४ ऑगस्ट रोजी नगर-सोलापूर महामार्गावर मिरजगाव शिवारातील एका हॉटेल समोर फिर्यादी महेंद्र पांडुरंग अलदर याच्या ताब्यातील टेम्पो घेवून जात असताना एक कार टेम्पोला आडवी लावली. या कारमधुन आलेल्या ४ जणांनी महेंद्र अलदर याच्या ताब्यातील टेम्पो आणि त्यात असणाऱ्या सोलर प्लेटा असा एकूण ८० लाख रुपयांचा मुद्देमाल पैशाच्या व्यवहारातून जबरदस्तीने चोरून नेला. याबाबत मिरजगाव पोलीस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आवश्य वाचा : गणेशोत्सवात नागरिकांच्या मदतीसाठी ‘पोलीस मित्र’

टेम्पो आणि सोलार प्लेटा जप्त (Street Robbery)

या घटनेच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्गे, कर्जतचे पोलीस उपअधीक्षक प्रवीणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मिरजगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्यासह पोलीस कर्मचारी प्रबोध हंचे, विकास चंदन, सुनील खैरे, समीर सय्यद, गोकुळदास पळसे, स्वाती जगधने, सायबरचे नितीन शिंदे तपास करीत असताना गोपनीय माहिती व तांत्रिक तपासाचे आधारे रणजित अरूण जाधव (वय २४वर्षे, बंडी शेगाव, ता.पंढरपुर, जिल्हा सोलापूर) याला म्हसवड (सातारा) येथे ताब्यात घेतले. त्याच्याकडून वरील घटनेतील टेम्पो आणि गुन्ह्यातील चोरी गेलेला ६५ लाख रुपये किमतीच्या सोलार प्लेटा असा एकुण ८० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. रणजीत जाधव यास गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींचा शोध चालू असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी दिली. या घटनेचा अधिक तपास सहायक फौजदार शंकर रोकडे हे करत आहेत.