Strike : नगर : बँकांमध्ये ५ दिवसांचा आठवडा लागू व्हावा, या मागणीसाठी आज (ता.२७) बँक कर्मचारी व अधिकारी (Bank employees and officers) यांची संयुक्त संघटना युनाइटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (United Forum of Bank Unions) ने एक दिवसाच्या संपाची (Strike) हाक दिली. प्रोफेसर चौकातील युनियन बँक ऑफ इंडिया (Union Bank of India) समोर आंदोलन करण्यात आले.
नक्की वाचा: गिरीश महाजनांना नडणाऱ्या माधवी जाधव नेमक्या कोण?
५ दिवसाच्या आठवडा करण्याची मागणी
यावेळी कांतीलाल वर्मा, सचिन शिरसाठ, माणिक अडाणे, विकास केदार, चेतन बुरा, मयूर जामगांवकर, सुजय उदरभारे, सुजय नळे पाटील, अमिता अडसुरे, अरुंधती पुजारी, सुरज गाडे, संदीप सरोवरे आदीसंह मोठ्या संख्येने बँकांतील कर्मचारी व अधिकारी यांनी संपात सहभाग घेतला. यावेळी अहिल्यानगर डिस्ट्रिक्ट बँक एम्प्लॉयीस चे अध्यक्ष कॉ. माणिक अडाणे यांनी घोषणा दिल्या. इंडियन बँक असोसिएशन सोबत झालेल्या द्विपक्षीय कराराच्या वेळी ५ दिवसाच्या आठवड्यावर येत्या काळात चर्चेतून निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते. परंतु आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झाली नाही.
अवश्य वाचा: अहिल्यानगरच्या पुरुषोत्तम कराड यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर
कॉ. रावसाहेब निमसे म्हणाले, (Strike)
देशातील अनेक सरकारी कार्यालये आहेत. जेथे ५ दिवसांचा आठवडा आहे. त्यामुळे कुठेही कामाचा खोळंबा होत नसून सर्वदूर काम व्यवस्थित होत असल्याची जाणीव त्यांनी करून दिली. परंतु बँकांमध्ये ते न राबविता आज बँक कर्मचारी व अधिकारी यांना रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. हे सरकार कामगार विरोधी असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे सर्व बँक कर्मचारी व अधिकारी यांनी संघटीतपणे एकत्रित याचा कडाडून विरोध करावा असे आवाहन त्यांनी केले. बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या प्रतिनिधींनी यावेळी आपले विचार व्यक्त करतांना बँकांमध्ये आज नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यामुळे ग्राहकांना बँकांच्या ५ दिवसाच्या आठवड्याचा कोणताही व्यवहारासाठी अडथळा येत नाही. ए टी एम. नेट बँकिंग, एप्स सारख्या सुविधा उपलब्ध आहे. ज्यामुळे ते बँकिंग सुविधेचा लाभ घेत आहेत.
विशेष म्हणजे बँकिंगशी निगडित असलेल्या रिझर्व्ह बँक, स्टॉक एक्सचेंज, सरकारी कार्यालये, इंडियन बँक असोसिएशन यांना सुध्दा पाचच दिवसाचा आठवडा आहे. हे विसरून चालणार नाही. परंतु सरकार बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांचा अंत पाहत असून त्यांच्या संयमाचा समाचार घेत आहे. आतापर्यंत कामगार आयुक्त यांच्या सोबत झालेल्या बैठकीत सुध्दा यावर विचार करून निर्णय देण्यावर बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांची बोळवण केली गेली. परंतु गेल्या आठवड्यातील दोन बैठकांमध्ये कोणताही ढोस निर्णय न झाल्याने नाईलाजास्तव आजचा दिवस उगवला. खरे तर पाच दिवसाच्या आठवड्याने बँकांचे कामाचे तास कमी होणार नाही कारण दोन शनिवारचे तास हे इतर पाच दिवसात विभागून देण्याचे संघटनेच्या नेत्यांनी मान्य केले आहे. तसेच नवीन नोकर भरती न केली गेल्याने त्याचा कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत आहे. असे त्यांनी म्हटले आहे.



