CM Ladki Bahin:भाजपकडून लाडकी बहीण योजनेची जोरदार जाहिरात,मात्र मुख्यमंत्री शब्द वगळला

0
CM Ladki Bahin:भाजपकडून लाडकी बहीण योजनेची जोरदार जाहिरात,मात्र मुख्यमंत्री शब्द वगळला
CM Ladki Bahin:भाजपकडून लाडकी बहीण योजनेची जोरदार जाहिरात,मात्र मुख्यमंत्री शब्द वगळला

Cm Ladki Bahin : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यासाठी अवघे काही तास वेळ बाकी आहे. त्यातच आता भाजपकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची’ (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) जोरदार जाहिरातबाजी (Advertisement) करण्यात आली आहे.’आधार लाडक्या बहिणीला आशीर्वाद महायुतीला’ अशा मथळ्याखाली राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर ही  जाहिरात देण्यात आली आहे. मात्र, भाजपने (BJP) दिलेल्या या जाहिरातीमधून मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) हा शब्द गायब झाला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महायुतीमधील कुरघोडीच्या राजकारण चव्हाट्यावर आले आहे.  

नक्की वाचा : मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही नाक्यांवर टोलमाफी,राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुख्यमंत्र्यांचे नाव वगळून लाडकी बहीण योजनेची जाहिरात (CM Ladki Bahin)

भाजपकडून देण्यात आलेल्या या जाहिरातीत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ ऐवजी केवळ ‘लाडकी बहीण योजना’ असा उल्लेख करण्यात आला आहे. यापूर्वी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केवळ ‘लाडकी बहीण योजना’ असा उल्लेख केला जात होता. यावर शंभुराजे देसाई यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या नाराजीनंतर जाहिरात देताना तिन्ही पक्षासाठी काय नियम पाळले जावेत,याबाबत नियमावली करण्याचा निर्णय झाला होता. परंतु, आता भाजपनेच मुख्यमंत्र्यांना वगळून लाडकी बहीण योजनेची जाहिरात केल्याने महायुतील नव्या वादाला तोंड फुटले आहे.

अवश्य वाचा : डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्‍या नावाने उभारलेले सभागृह प्रेरणादायी

जाहिरातीमध्ये नेमकं काय ?(CM Ladki Bahin)

भाजपकडून प्रमुख दैनिकांच्या फ्रंट पेजवर देण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये देवेंद्र फडणवीस यांना महिला राखी बांधतानाचा फोटो आहे. जाहिरातीच्या मथळ्यात ‘आशीर्वाद महायुतीला’ असा उल्लेख असला तरी कुठेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो दिसत नाही. महायुतीशासित महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना यशस्वी, चार हफ्ते जमा, असा मजकूर ठळक अक्षरात लिहण्यात आला आहे. याशिवाय, जाहिरातीमध्ये संक्षिप्त शब्दात इंडिया आघाडीच्या इतर राज्यातील योजनांच्या अपयशाबद्दल माहिती देण्यात आली आहे. तेलंगणा, हिमालच प्रदेश, कर्नाटक आणि झारखंडमध्ये इंडिया आघाडीने योजनांच्या नावाखाली नागरिकांची कशाप्रकारे फसवणूक केली, हे जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here