Students : पाथर्डी : तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना (Students) सध्या शिक्षणासाठी अक्षरशः जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात सार्वजनिक वाहतूक सेवा (Public Transport Services) उपलब्ध नसल्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असून, धोकादायक प्रवास (Perilous Journey) करणे त्यांच्यासाठी अपरिहार्य बनले आहे.
नक्की वाचा : श्रीपाद छिंदम यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार; अंगरक्षकाची मागणी
डिझेलचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने बससेवा विस्कळीत
पाथर्डी तालुक्यातील अनेक खेड्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वेळेत बससेवा उपलब्ध नसल्याने शाळेत वेळेत पोहोचणे विद्यार्थ्यांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. यामध्ये भर म्हणजे एसटी महामंडळाकडून डिझेलचा पुरवठा वेळेवर होत नसल्याने गेल्या दोन दिवसांपासून बससेवा विस्कळीत झाली आहे. परिणामी बसचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले असून, विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे हाल होत आहेत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
जीपच्या पाठीमागे लटकून विद्यार्थी करतात प्रवास (Students)
शिक्षणासाठी धडपड करणाऱ्या विद्यार्थ्यांना पर्याय नसल्याने मिळेल त्या वाहनाने प्रवास करण्याची वेळ आली आहे. अनेक ठिकाणी चारचाकी जीपच्या पाठीमागे लटकून विद्यार्थी प्रवास करत असल्याचे चित्र दिसत आहे. हा प्रवास अत्यंत धोकादायक असून, कोणतीही दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. ग्रामीण भागातील पालक व नागरिकांकडून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असून, तात्काळ नियमित आणि पुरेशी बससेवा सुरू करण्याची मागणी होत आहे. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणारी ही परिस्थिती लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.



