Students With Disabilities | पायाने लिखाण करणारा आयुष देणार दहावीचा पेपर

0

Students With Disabilities | राहुरी : राहुरी (Rahuri) स्टेशन येथील प्रसाद माध्यमिक विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थी (Students With Disabilities) आयुष बाबासाहेब जाधव दहावीच्या परीक्षेला बसला आहे आज पर्यंत गुडघ्याखालील एका पायाने लिखाण करणारा आयुष यावेळी प्रथमच लेखनिक ( रायटर ) ची मदत घेऊन पेपर सोडवणार आहे. त्याच्या या परीक्षेतील कामगिरीकडे त्याचे स्वतः चे अधिक लक्ष लागलेले आहे.परीक्षेची मी जय्यत तयारी केली असल्याचे आयुष्य सांगतो.

अवश्य वाचा: पाकिस्तानचा पुन्हा खिम्मा, T20 मध्ये भारताने पाकिस्तानला 61 धावांनी पाजलं पाणी

उभा राहू शकत नाही

वाघाचा आखाडा येथील जिल्हा परिषद शाळेत पहिलीत दाखल झालेला आयुष हाताने काहीही करू शकत नाही. पायावर उभा राहू शकत नाही त्या शाळेतील शिक्षक संतोष भैरी यांनी त्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणले .नंतर राहुरी नगरपालिकेच्या शाळेतील शिक्षक नवनाथ लाड यांनी त्यास शिष्यवृत्ती परीक्षेत बसवले. या परीक्षेत तो देसवंडी केंद्रात पहिला आला तर राज्यात तिसरा आला. त्यास २०० पैकी १६८ गुण मिळाले होते. त्याला ४८ हजार रुपये वर्षाला शिष्यवृत्ती मिळते. त्याच्या आईची प्रसुती मुदतीपूर्व सातव्या महिन्यातच झाली आणि त्यांमुळे आयुष दिव्यांग झाला. हा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक ठिकाणी अनेक तज्ज्ञ डॉक्टरांना उपचारार्थ दाखविण्यात आले मात्र यावर काहीही उपाय नाही.

हे पहा – बुधवार पेठेत पोलिसांचं सर्च ऑपरेशन का? पहा सर्वात मोठा खुलासा

दररोज सहा सात तास अभ्यास

शस्त्रक्रियेतून मर्यादित यश मिळेल कदाचित आयुषला कायमस्वरूपी बिछान्यावर पडावे लागेल असे नामांकीत आँर्थो सर्जन यांनी सांगितल्याचे त्याचे वडील बाबासाहेब जाधव यांनी सांगितले.परंतु तरीही परिस्थिती पुढे हार न मानता जिद्दीने पाय नसतानाही पायावर उभे राहण्याचा प्रयत्न आयुष करीत आहे. ऑनलाइन ॲप द्वारे दररोज सहा सात तास अभ्यास करून आता दहावीच्या परीक्षेसाठी तो सज्ज झाला आहे. अनेक विषयांच्या सराव प्रश्नपत्रिका त्याने घरी सोडविल्या आहेत. दहावीच्या परीक्षेत चांगले यश मिळवून पुढे प्रथम श्रेणी अधिकारी होण्याचे त्याचे स्वप्न आहे. 

प्रसाद माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्जेराव पेरणे यांनी आत्मविश्वास व जिद्दीच्या जोरावर दहावीच्या परीक्षेत  तो चांगले यश मिळवेल असा आशावाद व्यक्त केला व त्यास घरी जावून शुभेच्छा दिल्या. त्याचे वडील बाबासाहेब जाधव यांनी वेदांतू ॲपच्या शिक्षकांनी त्याच्या नोट्स पाहून पुढच्या वर्षी दहावीच्या मुलांसाठी त्या नोट्स देण्याची विनंती केल्याचे सांगितले. आयुषने अनेक निबंध, हस्ताक्षर स्पर्धा त्याचे साठी पायाक्षर स्पर्धेत भाग घेतला. त्या ठिकाणीही त्याने चांगले यश मिळवले आहे. नुकत्याच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घेतलेल्या कुटुंब प्रबोधन व सामाजिक माध्यम या विषयावरील निबंध स्पर्धेतही त्याने भाग घेतला होता. पाय काम करत नाहीत. हात काम करत नाहीत केवळ गुडघ्या खालील एक पायातील सामर्थ्य ओळखून जीवन संर्घषात हा पाय त्याच्या जीवनात आधारभूत आहे. स्वतःच्या पायाच्या मदतीने तो जेवण करतो. अन्य क्रिया करतो. तो ऑनलाईन बुध्दीबळ शिकला.तो पुस्तके वाचतो.भावंडा बरोबर क्रिकेट खेळतो.

अवश्य वाचा: पाकिस्तानचा पुन्हा खिम्मा, T20 मध्ये भारताने पाकिस्तानला 61 धावांनी पाजलं पाणी

गुडघ्याखालील पाय ज्यावर तो उभा राहू शकत नाही. मात्र, त्याच्या मदतीने स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा, जीवनाला दिशा, प्रगतीचा त्याचा हा प्रयत्न सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. या त्रुटी सहानुभूती न मिळवता जिद्दीने, आत्मविश्वासाने तो उभा राहतो आहे. समाजातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संघटना यांनी त्याचे पालकत्व स्वीकारले तर त्याचा जीवन संघर्ष अधिक यशस्वी ठरू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here