Subhash Londhe : नगर : घरपट्टीचा चुकीचा सर्व्हे झाल्याच्या व घरपट्टी (House Rent) वाढल्याच्या तक्रारी आहेत. पाणी पट्टीही वाढली आहे. पुरेसे पाणी मात्र शहरात मिळत नाही. पार्किंग शुल्कही वाढले आहे. त्यामुळे या वाढीव शुल्कांचा स्थायी समितीच्या सर्व सदस्यांच्या उपस्थितीत फेरआढावा घेऊन ते कमी करण्यास प्राधान्य देणार असल्याची ग्वाही मनपा स्थायी समितीचे (Municipal Corporation Standing Committee) नवे सभापती व भाजपचे नगरसेवक सुभाष लोंढे (Subhash Londhe) यांनी मंगळवारी (ता.१०) दिली.
नक्की वाचा : भारताने रचला इतिहास; तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाचे जेतेपद
स्थायी समितीच्या सभापतीपदी लोंढे यांची बिनविरोध निवड
महापलोकेच्या स्थायी समितीचे सभापती तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापतीपदांची निवड झाली. स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे नगरसेवक लोंढे यांची बिनविरोध निवड झाली. तर महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी राष्ट्रवादीच्या नगरसेविका दीपाली बारस्कर व उपसभापतीपदी भाजपच्या नगरसेविका वर्षा सानप यांचीही बिनविरोध निवड झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या दोन्ही समिती सदस्यांच्या बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यानंतर ते बोलत होते.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
सत्ता वाटपाच्या सूत्रानुसार स्थायी सभापतीपद भाजपला (Subhash Londhe)
नगर शहर वासियांना रोज पाणी देण्यात काय अडचणी आहेत, हे जाणून घेऊन त्या स्थायी सभापती सुभाष लोंढे यांची घोषणा सोडवण्यात येतील व रोज पाणी देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले. महापालिकेत अजितदादा राष्ट्रवादी व भाजप युतीची सत्ता आहे. या सत्ता वाटपाच्या सूत्रानुसार स्थायी समितीचे सभापतीपद भाजपला दिले गेले आहे.
यावेळी आयुक्त यशवंत डांगे व नगर सचिव मेहेर लहारे उपस्थित होते. बाजारपेठेत महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्याने अनेक अडचणी येतात. त्यामुळे प्राधान्याने यादृष्टीने प्रयत्न करणार आहे. बाजारपेठ व मुख्य रस्त्यांवर महिलांसाठी स्वच्छतागृहे करण्यासाठी जागा शोधल्या जातील व तेथे त्यांची उभारणी करण्यास प्राधान्य देताना नवजात बालकांच्या स्तनपानासाठी मनपा क्षेत्रात महिलांसाठी हिरकणी कक्षही उभारण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.



