नगर : इस्रोला (ISRO) म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला आज मोठं यश मिळालं आहे. कारण इस्रोच्या पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहन टेक्नॉलॉजीची (Technology) चाचणी यशस्वी पार पडली. इस्रोचे पुन्हा वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन पुष्पक आज (ता.२२) सकाळी ७ वाजून १० मिनिटांनी कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील एरोनॉटिकल चाचणी दरम्यान यशस्वीरित्या धावपट्टीवर उतरले आहे. RLV LX-02 लँडिंग प्रयोग सुरू केल्याने, पुन्हा वापरण्यायोग्य असलेल्या या व्हेईकलने टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात एक मोठा टप्पा गाठला गेला आहे.
नक्की वाचा : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक
पुन्हा वापरता येणाऱ्या प्रक्षेपण वाहनाचे इस्रोकडून यशस्वीरित्या लॅंडींग (ISRO Pushpak Launch)
इस्रोने यापूर्वी दोन वेळा पुन्हा वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन यशस्वीरित्या लॅंडींग केले आहे. गेल्या वर्षी, इस्रोने पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहनाच्या टेस्टिंग दरम्यान, RLV हे हवाई दलाच्या चिनूक हेलिकॉप्टर मधून सुमारे साडेचार किलोमीटर उंचीवरून प्रक्षेपित केले होतं. या चाचणी दरम्यान, RLV धावपट्टीवर यशस्वीरित्या उतरले. त्याने ब्रेक पॅराशूट, लँडिंग गियर ब्रेक आणि नोज व्हील स्टीयरिंग सिस्टमच्या मदतीने यशस्वी लँडिंग केले. पुन्हा वापरता येण्याजोग्या प्रक्षेपण वाहनाच्या यशस्वी लँडिंगने नेव्हिगेशन, कंट्रोल सिस्टम, लँडिंग गियर आणि डिलेरेशन सिस्टम यांसारख्या इस्रोने विकसित केलेल्या टेक्नॉलॉजीच्या यशाचा पुन्हा एकदा उल्लेख केला आहे.
अवश्य वाचा : संत शेख महंमद महाराजांचे लाखो भाविकांनी घेतले दर्शन
पुष्पकची खास वैशिष्ट्ये : (ISRO Pushpak Launch)
*पुष्पक हे पुन्हा वापरण्यायोग्य प्रक्षेपण करणारे विमान आहे. पंख असलेल्या विमानासारखे दिसणारे हे विमान आहे. ६.५ मीटर लांबीच्या या विमानाचे वजन १.७५ टन आहे.
*आज या विमानाच्या रोबोटिक लँडिंग क्षमतेची चाचणी घेण्यात आली.
*अंतराळात प्रवेश किफायतशीर करण्यासाठी हे खूप प्रभावी पाऊल आहे.
*हे पुन्हा वापरता येण्याजोगे प्रक्षेपण वाहन आहे, ज्याचा वरचा भाग सर्वात महागड्या उपकरणांनी सुसज्ज आहे.
*याचं सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे अंतराळातील उपग्रहाला नंतर इंधन भरण्यासाठी किंवा दुरुस्तीसाठी परत आणण्यातही ते मदत करेल.