Sudhir Phadke :’स्वरगंधर्व सुधीर फडके’ मध्ये ‘हे’ कलाकार साकारणार ‘या’ मुख्य व्यक्तिरेखा

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या चित्रपटात सुधीर फडके म्हणजेच बाबुजींची भूमिका अभिनेते सुनील बर्वे साकारत आहे.

0
Swargandharva Sudhir Phadke
Swargandharva Sudhir Phadke

नगर : गायक, गीतकार, संगीतकार, स्वातंत्र्यसैनिक सुधीर फडके यांच्या जीवनावर आधारित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या चित्रपटात सुधीर फडके म्हणजेच बाबुजींची भूमिका अभिनेते सुनील बर्वे (Sunil Barve) साकारत आहे. तर त्यांच्या पत्नीची म्हणजेच ललिताबाईंची भूमिका मृण्मयी देशपांडे (Mrunmayi Deshpande) हिने साकारली आहे. तर ग. दि. माडगुळकर यांची भूमिका सागर तळाशीकर करत आहेत. या महत्वपूर्ण भूमिका समोर आल्यानंतर आता या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखेवरील पडदा उठला असून या नामवंत व्यक्तिरेखा कोण साकारणार आहेत, हे समोर आले आहे.

नक्की वाचा :  ‘कर्मवीरायण’ मधून उलगडणार भाऊराव पाटलांचा जीवन प्रवास; ‘हा’ अभिनेता साकारणार अण्णांची भूमिका 

‘स्वरगंधर्व सुधीर फडके’ मध्ये ‘हे’ नामवंत कलाकार (Sudhir Phadke)

आदिश वैद्य (तरूण सुधीर फडके), अपूर्वा मोडक (आशा भोसले), सुखदा खांडकेकर (माणिक वर्मा), मिलिंद फाटक ( राजा परांजपे), धीरज जोशी (स्वातंत्र्यवीर सावरकर), विहान शेडगे (छोटा राम), विभावरी देशपांडे (सरस्वतीबाई, सुधीर फडकेंची आई), नितीन दंडुके (पाध्ये बुवा), परितोष प्रधान (डॉ. अशोक रानडे), साहेब मामा फतेहलाल (अविनाश नारकर), डॉ हेडगेवार (शरद पोंक्षे), न. ना. देशपांडे ( उदय सबनीस), मोहम्मद रफी (निखिल राऊत), निखिल राजे शिर्के ( श्रीधर फडके) हे कलाकार या व्यक्तिरेखा साकारणार आहेत. या नामवंत कलाकारांना या व्यक्तिरेखांमध्ये पाहणे म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

अवश्य वाचा : ‘कोव्हिशिल्ड लसीचे मानवी शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात’;अ‍ॅस्ट्राझेनेकाची कबुली

१ मे रोजी चित्रपट होणार प्रदर्शित (Sudhir Phadke)

येत्या महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. सौरभ गाडगीळ प्रस्तुत, रिडिफाईन प्रॅाडक्शन्स निर्मित ‘स्वरगंधर्व सुधीर फडके’चे सौरभ गाडगीळ आणि योगेश देशपांडे निर्माते आहेत. तर या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन योगेश देशपांडे यांचे आहे.

कलाकारांच्या निवडीबद्दल दिग्दर्शक योगेश देशपांडे म्हणतात, ‘कलाकारांची निवड करताना प्रत्येक कलाकार हा त्या व्यक्तिरेखे सारखा तंतोतंत दिसला पाहिजे, असा माझा अट्टाहास नव्हता. परंतु त्या व्यक्तिरेखेचे गुण त्या कलाकारातून झळकावेत, असे मला वाटत होते. मुळात मी जाहिरात क्षेत्रातील असल्याने मी प्रत्येक कलाकाराचे स्केच बनवले. त्यातूनच मग मला माझ्या व्यक्तिरेखा सापडत गेल्या. हे सगळेच कलाकार मातब्बर आहेत आणि त्यांनी या भूमिका चपखल साकारल्या आहेत. प्रेक्षकांना चित्रपट पाहताना हा अनुभव निश्चितच येईल.’’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here