Sudhir Tambe : रावसाहेब शिंदे यांचा वैचारिक वारसा जपावा – डॉ. सुधीर तांबे

Sudhir Tambe : रावसाहेब शिंदे यांचा वैचारिक वारसा जपावा - डॉ. सुधीर तांबे

0
Sudhir Tambe : रावसाहेब शिंदे यांचा वैचारिक वारसा जपावा - डॉ. सुधीर तांबे
Sudhir Tambe : रावसाहेब शिंदे यांचा वैचारिक वारसा जपावा - डॉ. सुधीर तांबे

Sudhir Tambe : श्रीरामपूर : भारतीय स्वातंत्र्य संग्राम (Indian Freedom Struggle), शैक्षणिक (Educational), सामाजिक सेवेचे आदर्श असणारे दिवंगत ॲड. रावसाहेब शिंदे आणि शिक्षण, साहित्य क्षेत्रातील ज्ञानतपस्वी व्यक्तिमत्त्व असणारे दिवंगत डॉ. र.बा. मंचरकर यांच्या समर्पित जीवन कार्याचा वैचारिक वारसा जपला पाहिजे, असे मत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे (Sudhir Tambe) यांनी व्यक्त केले.

ॲड. रावसाहेब शिंदे यांची ९६ वी जयंती

येथील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानतर्फे महादेव मळ्यात ॲड. रावसाहेब शिंदे यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुधीर तांबे बोलत होते. अध्यक्षस्थानी डॉ. राजीव ररावसाहेब शिंदे यांच्या समाधीला पुष्पांजली अर्पण करून ॲड. रावसाहेब शिंदे व डॉ. र.बा. मंचरकर यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन आले. यावेळी डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते माजी प्राचार्य टी.ई. शेळके यांना दिवंगत अॅड. रावसाहेब शिंदे स्मृती जीवन गौरव पुरस्कार तर कोपरगाव येथील प्रा.डॉ. बाबासाहेब शेंडगे यांना दिवंगत डॉ. र.बा. मंचरकर स्मृती प्रेरणा पुरकार प्रदान करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य टी.ई. शेळके, डॉ. बाबासाहेब शेंडगे, डॉ. प्रेरणा शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.

यांची उपस्थिती (Sudhir Tambe)

यावेळी शशिकला शिंदे, सुजाता हुंबे, डॉ. प्रथमा मंचरकर, प्रकाश पाटील निकम, अॅड. भागचंद चुडिवाल, प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील, प्राचार्य डॉ. शंकरराव गागरे, प्राचार्य विनोद रोहमारे, बापूसाहेब पटारे, डॉ. रवींद्र कुटे, सखाराम कार्डिले महाराज, नीतीन औताडे, प्राचार्या रंजना जरे, प्राचार्या चित्रा सूरडकर, डॉ. श्रीकांत भालेराव, प्राचार्य डॉ. गोरख बारहाते, रामराव पडघन, सुभाष लिंगायत, दत्तात्रय रायपल्ली, सुभाष गायकवाड आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संगीता फासाटे यांनी करून आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here