Sugar factory : श्रीरामपूर : जिल्ह्यातील बहुतांश सहकारी साखर कारखान्यांनी (Sugar factory) गेल्या दहा ते बारा वर्षांपासून वेळेत एफआरपी दिलेला नसून त्याबाबतची व्याज कायद्याने (Law) देणे बंधनकारक आहे. तसेच ज्या कारखान्यांनी कारखाना कर्मचाऱ्यांचे पेमेंट (Payment) थकविले आहे, अशा कारखान्यांना गाळप परवाना देऊ नये, अशी मागणी शेतकरी संघटनेचे (Farmers Association) जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या शिष्टमंडळाने प्रादेशिक सहसंचालक व जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
नक्की वाचा : आदिवासी भागातील शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने मोठे नुकसान
कार्यालयाला कुलूप ठोकणार असल्याचा इशारा
या शिष्टमंडळात शेतकरी संघटनेचे श्रीरामपुर तालुकाध्यक्ष युवराज जगताप, पशुवैद्यकीय शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. दादासाहेब आदिक, श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रभाकर कांबळे, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते साहेबराव चोरमल यांचा समावेश होता. अशा कारखान्यासह कारखाना संचालक मंडळाच्या चौकशी करून झालेला भ्रष्टाचार व्यवस्थापन समितीच्या व्यक्तिगत मालमत्ता ताब्यात घेऊन वसूल करावा. शासन स्तरावर याबाबत कुठलीही कारवाई न झाल्यास संबंधित कारखान्याचे गाळप परवाने न थांबविल्यास 14 ऑगस्ट 2024 रोजी शेतकरी संघटना प्रादेशिक सहसंचालक यांच्या कार्यालयाला कुलूप ठोकणार असल्याचा इशारा दिला आहे.
अवश्य वाचा: नगर-दाैंड महामार्गावरील वाहतुकीत बदल
सबंधित कारखान्यांवर कारवाईचे आश्वासन (Sugar factory)
ज्या कारखान्यानी मूल्यांकनापेक्षा जास्तीचे कर्ज जिल्हा बँकेकडून घेतले आहे, अशा कारखान्यांबाबत मी जिल्हा बँकेचा शासनाचा प्रतिनिधी व शासनाचा संचालक म्हणून जिल्हा उपनिबंधक या जबाबदारीने जिल्हा बँकेच्या मासिक मीटिंग मधील प्रोसिडिंगवर विरोध दर्शविला असून तसे शेरे मारलेले आहेत. माझ्याकडे अतिरिक्त पदभार आहे. तरी सबंधित कारखान्यांवर कारवाई करू, असे आश्वासन जिल्हा उपनिबंधक व प्रादेशिक सहसंचालक गणेश पूरी यांनी दिले.