Sugar Factory : अन्यथा हंगाम बंद पाडू; शेतकरी संघटनांचा इशारा, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मागणी

Sugar Factory : अन्यथा हंगाम बंद पाडू; शेतकरी संघटनांचा इशारा, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मागणी

0
Sugar Factory : अन्यथा हंगाम बंद पाडू; शेतकरी संघटनांचा इशारा, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मागणी
Sugar Factory : अन्यथा हंगाम बंद पाडू; शेतकरी संघटनांचा इशारा, जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मागणी

Collector Office : नगर : साखर कारखानदार (Sugar Factory) जाहीर केलेले दर देत नाहीत. उसाचा काटा मारण्याचा प्रकार कधी थांबणार? ऊस (Sugarcane) घातल्यानंतर चौदा दिवसांत पैसे देण्याची कायद्यातील तरतुदीचे पालन करणार का? ज्या कारखान्यांनी पैसे थकवले त्यांच्याकडून १५ टक्के व्याजासह रक्कम द्या. उसाला साडे तीन हजार रुपये दर न द्या; अन्यथा हंगाम बंद पाडू, असा इशारा शेतकरी संघटनांनी (Farmers’ Organization) इशारा दिला.

अवश्य वाचा: सफाई काम करणाऱ्या महिलेची मुलगी झाली क्लास वन अधिकारी

ऊसदर व अन्‍य प्रश्नांबाबत कारखाना प्रतिनिधी, शेतकरी संघटना संयुक्त बैठक

साखर कारखान्यांच्या गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊसदर व अन्‍य प्रश्नांबाबत प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित नेहरू सभागृहात कारखाना प्रतिनिधी, शेतकरी संघटना आणि शेतकऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. अतिरिक्त जिल्हाधिकारी शैलेश हिंगे अध्यक्षस्थानी होते. स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे अध्यक्ष रावसाहेब लवांडे, शिवसेना (शिंदे गट) नेते अभिजित पोटे, बाळासाहेब फटांगडे, रमेश कचरे, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, संजय जाधव, कृष्णा सातपुते, संजय वाघ, महादेव आव्हाड, बाळासाहेब कदम आदींनी कारखान्याच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला.

नक्की वाचा : “पंकजा मुंडेंना गृहमंत्री तर सुषमा अंधारेंकडे महिला आयोगाचं अध्यक्षपद द्या”

कारखान्यावरील वजन काट्यामध्ये मापाची चोरी (Sugar Factory)

कर्नाटक राज्यात उसाला ४ हजार ३०० रुपये प्रतिटन दर देतात, मग जिल्ह्यातील कारखाने का देऊ शकत नाहीत? कारखान्यावरील वजन काट्यामध्ये घोटाळा असून, मापाची चोरी केली जाते, साखर उतारा कमी दाखविला जातो. शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर दिले जात नाहीत. गाळपाच्या वेळेस जाहीर केलेला भाव प्रत्यक्षात दिला जात नाही. प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाचे अधिकारी कारखान्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाचे अधिकारी शेतकरी संघटनांचे नेते आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला समर्पक उत्तरे देऊ शकले नाहीत. सहसंचालक संजय गोंदे यांनी कारखाने दर जाहीर केल्यावर आम्हाला कळवत नाहीत, साखर उतारा निश्‍चित करण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे प्रतिनिधी पडताळणी करतात, कारखान्यांनी ऊस घेतल्यानंतर वेळेत पैसे न दिल्यास १५ टक्के व्याजासह पैसे देणे कायद्यात आहे. याबाबत वरिष्ठ कार्यालयास प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन दिले.

या आहेत मागण्या
केंद्राने जाहीर केल्याप्रमाणे उसाला ३ हजार ५५१ रुपये प्रती टन दर द्यावा
इथेनॉल निर्मिती प्रकल्प असलेल्या कारखान्यांनी अतिरिक्त २०० प्रतीटन रुपये ज्यादा द्यावेत
खासगी वजन काट्यावरील उसाचे वजन ग्राह्य धरावे.

शेतकरी संघटनेचा निर्णय
केंद्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे प्रति टन ३ हजार ५५० रुपये भाव कारखान्यांनी जाहीर करावा. कुकडी साखर कारखान्याने थकीत असणारे शेतकऱ्यांचे ७११ रुपये प्रति टन प्रमाणे पैसे द्यावे; अन्यथा १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आम्ही हजारो ऊस उत्पादक शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालय आणि प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयावर मुक्काम आंदोलन करतील, अशी भूमिका शेतकरी संघटनेचे नेते अभिजित पोटे यांनी जाहीर केली.