Sugar Production: नगर : सलग तिसऱ्या वर्षी १०९ लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक साखरेचे उत्पादन (Sugar Production) करीत महाराष्ट्र (Maharashtra) राज्याने अव्वल स्थान पटकावले. सलग तिसऱ्या वर्षी उत्तर प्रदेशाला (Uttar Pradesh) मागे टाकत सर्वाधिक उत्पादन घेतले आहे. वर्षांच्या सुरुवातीला झालेला पाऊस आणि इथेनॉल (Ethanol) निर्मितीवरील निर्बंधांमुळे साखरेच्या उत्पादनात मुळ अंदाजापेक्षा १५ते २० टक्क्यांनी वाढ झाल्याचे सहकार विभागातील सूत्रांनी सांगितले.
हे देखील वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सर्वात जास्त विकासकामे: विखे पाटील
इथेनॉल निर्मितीवरील बंदीचे परिणाम (Sugar Production)
गतवर्षी पावसाने दडी मारल्याने आणि वातावरणातील बदलामुळे उसाच्या पिकावर परिणाम झाला होता. त्यामुळे राज्यात हंगामाच्या सुरुवातीस ८५ लाख मेट्रिक टन, तर सुधारित अंदाजानुसार ९५ लाख मेट्रीक टन साखरेचे उत्पादन होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. राज्याप्रमाणे देशातही साखरेचे उत्पादन घटण्याची शक्यता केंद्राने वर्तविली होती. त्यामुळे २०२३-२४चा गाळप हंगाम सुरू होताच, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात केंद्राने उसाच्या रसापासून इथेनॉल निर्मितीवर बंदी घातली. परिणामी साखरेचे उत्पन्न वाढले. मराठवाडय़ातील १८ कारखान्यांचे गाळप अद्याप सुरु आहे.
नक्की वाचा: रांजणगाव मशीद येथील दरोड्यातील सहा आरोपी गजाआड
देशात ३१८ लाख मेट्रीक टन साखर उत्पादित (Sugar Production)
आतापर्यंत १०९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले असून यात आणखी वाढीची अपेक्षा आहे. देशात ५३५ कारखान्यांनी आतापर्यंत ३१८ लाख मेट्रीक टन साखर उत्पादित केली आहे. यात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांचा वाटा ८३ टक्के आहे. महाराष्ट्राच्या खालोखाल उत्तर प्रदेशात १२१ कारखान्यांनी १०५ लाख टन साखरेचे उत्पादन घेतले असून कर्नाटकात ७६ कारखान्यांनी ५० लाख टन साखर निर्मिती केली आहे. देशभरात गतवर्षीच्या तुलनेत उत्पन्न १२ लाख टनांनी घटले असले, तरी अद्याप काही ठिकाणी हंगाम सुरू असल्याने ही तूट काहीशी भरून निघेल.