Sugarcane worker : ऊस तोडणी मजुरांच्या झोपड्या जळून खाक

Sugarcane worker : ऊस तोडणी मजुरांच्या झोपड्या जळून खाक

0
Fire

Sugarcane worker : संगमनेर : तालुक्यातील समनापूर येथे ऊस तोडणीसाठी (Sugarcane worker) आलेल्या संगमनेर येथील भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या (Bhausaheb Thorat Sahakari Sakhar Karkhana Ltd.) मजुरांच्या झोपड्यांना लागलेल्या भीषण आगीत (Fire) तीन झोपड्यातील सर्व संसारोयोगी साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने या आगीत जीवितहानी झाली नाही.

हे देखील वाचा: नगरच्या पहिल्या खासदाराने जनतेसाठी फोडलं होतं सरकारी गोदाम

चुलीच्या राखेतील ठिणगी उडाल्याने आग (sugarcane worker)

याबाबत अधिक माहिती अशी, संगमनेर साखर कारखान्यासाठी ऊस तोडणी मजूर म्हणून चाळीसगाव तालुक्यातून दगडू सुखदेव पगारे, नाना भारत निकम व  भारत रामा निकम हे मजूर म्हणून आलेले आहेत. हे मजूर आज (ता.२) पहाटे पाच वाजता तालुक्यातील रहिमपूर येथे ऊस तोडणीसाठी गेले होते. त्यांच्या पाचट व प्लास्टिकच्या कापडांनी बनवलेल्या झोपड्यांना आज सकाळी दहाच्या सुमारास चुलीच्या राखेतील ठिणगी उडाल्याने आग लागली. या आगीत तीन झोपड्या जळून खाक झाल्या. त्यामध्ये कपडे, धान्य, पैसे, भांडीकुंडी व दागिने असल्याचे समजते. या घटनेत सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते. आग लागल्याचे समजतात या परिसरातील ग्रामस्थांनी व ऊस तोडणी कामगारांनी आग विझवण्यासाठी धाव घेतली.

Fire

नक्की वाचा: उत्कर्षा रुपवते यांच्या रुपाने वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात?

आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी (Sugarcane worker)

संगमनेर कारखान्याच्या अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला व त्याने आग विझवली. ही आग तातडीने आटोक्यात आली नसती तर परिसरातील 25 ते 30 झोपड्यांचे नुकसान झाले असते. यामुळे त्या झोपड्या वाचवण्यात यश आले आहे. या घटनेचा पंचनामा तलाठी संतोष लंके, मनोज मंडलिक यांनी केला असून शासनाने या कामगारांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here