
Sugarcane worker gives birth on the road : नगर : वैद्यकीय सेवा वेळेत न मिळाल्याने महिलेला रस्त्यातच प्रसुत व्हावे लागल्याची (Sugarcane worker gives birth on the road) घटना अहिल्यानगरमध्ये आज (ता. ९) घडली. त्यामुळे अहिल्यानगरमधील वैद्यकीय प्रशासनावर (Civil District Hospital) मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अहिल्यानगर- छत्रपती संभाजी नगर राेडवर जेऊर परिसरात एका महिलेची रस्त्यातच प्रसुती (Delivery on the road) झाल्याची घटना समोर आली आहे. या महिलेला जेऊर येथील आरोग्य केंद्रातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून मुलाची व आईची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
अवश्य वाचा: नाशिक-पुणे रेल्वे संगमनेर मार्गेच व्हावी: खासदार भाऊसाहेब वाकचौरे
नाशिकहून नेवासा तालुक्यातील ऊसतोडणीसाठी
प्रियंका जाधव असे महिलेचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की जाधव कुटुंब हे नाशिकहून नेवासा तालुक्यातील घोडेगाव परिसरात ऊसतोडणीसाठी आले होते. मात्र, आज अचानक पोटात दुखू लागल्याने जाधव कुटुंबीयांनी घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी रक्त लघवी तपासून जाधव कुटुंबीयांना अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला.

नक्की वाचा : कष्टकऱ्यांचा आवाज हरपला! ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांचे निधन
आई व बाळाची प्रकृती स्थिर (Sugarcane worker gives birth on the road)
संबंधित महिलेला अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात घेऊन येत असतानाच जेऊर परिसरात महिलेच्या पोटात दुखू लागल्याने तिथेच प्रसुती झाली. या घटनेची माहिती कळतात आरोग्य केंद्रातील डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांनी सदर महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून बाळाची व आईची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
नाशिकहून अहिल्यानगर येथे आलेल्या ऊसतोड कामगार महिलेची रस्त्यातच प्रसुती झाली. ही घटना नगर-छत्रपती संभाजी नगर रस्त्यावरील जेऊर परिसरात घडली. या महिलेला तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलवले असून, बाळ व तिच्यावर उपचार सुरू असुन तिची व बाळाची प्रकृती स्थिर आहे. ही महिला सात महिन्यांची गर्भवती असतानाच तीची प्रसुती झाली असल्याचे जिल्हा रुग्णालयातर्फे सांगण्यात आले आहे.


