Sugarcane Workers : नगर : समाज कल्याण विभागाच्या (Department of Social Welfare) पुढाकारातून ऊसतोड कामगारांना (Sugarcane Workers) ओळख मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हा परिषद अहिल्यानगरच्या (Ahilyanagar Zilla Parishad) ग्रामपंचायत विभागाने तसेच जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांच्या सहकार्याने स्मार्ट सर्विसेस यांच्यामार्फत ऊसतोड कामगारांचे व्यापक सर्वेक्षण करण्यात आले. आज (ता. ९) रोजी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (Dr. Pankaj Ashiya) यांच्या हस्ते या ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, समाज कल्याण विभागाची सहाय्यक उपायुक्त प्रवीण कोरगंटीवार आदींसह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नक्की वाचा : वादात असलेली जमीन खरातनेच विकत घेतली; संगमनेरमध्ये खळबळ
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते दिले ओळखपत्र
या सर्वेक्षणात जिल्ह्यात एकूण २ हजार ५४३ ऊसतोड कामगारांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी १ हजार २८५ कामगारांची ओळखपत्रे तयार करण्यात आली आहेत. यावेळी सपना अरविंद राठोड, अनिल सिनाप्पा फुलमाळी यांना प्रातिनिधिक स्वरूपात जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या हस्ते ओळखपत्र देण्यात आले. या ओळखपत्रांमुळे कामगारांना शासकीय योजनांचा लाभ घेणे अधिक सुलभ होणार आहे, तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षणही अधिक प्रभावीपणे होईल.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
मृत व्यक्तीच्या वारसांना नोकरीचे प्रमाणपत्र (Sugarcane Workers)
तसेच दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजनेअंतर्गत दोन लाभार्थ्यांना शेतजमीन देण्यात आली. व ॲट्रॉसिटी कायद्या अंतर्गत अनुसूचित जाती जमातींमधील मृत पावलेल्या व्यक्तीच्या वारसांना शासकीय नोकरीचे प्रमाणपत्र आज जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते या ओळखपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अनेक कामगारांनी पहिल्यांदाच अधिकृत ओळखपत्र मिळाल्याने समाधान व्यक्त केले.

जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले की, ऊसतोड कामगार हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा घटक असून त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. या उपक्रमामुळे कामगारांना विविध शासकीय सुविधा, आरोग्य सेवा आणि सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ घेणे सोपे होईल, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे ऊसतोड कामगारांच्या जीवनात सकारात्मक बदल घडण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.



