Suicide : कर्जत : कोपर्डीच्या यात्रेत तमाशा चालू असताना समोर नाचल्यामुळे मागासवर्गीय (Backward class) तरुणाला जातीवाचक शिवीगाळ (Caste abuse) करुन नंतर नग्न करत मारहाण केली. या प्रकारामुळे तरुणाने आत्महत्या (Suicide) केल्याने तिघांविरुद्ध गुन्हा दाखल (Filed a case) झाला आहे.
नक्की वाचा: नरेंद्र माेदींची मंगळवारी नगरमध्ये ताेफ धडाडणार; कुणावर निशाणा साधणार
तमाशात नाचण्याच्या कारणावरुन मारहाण (Suicide)
विठ्ठल कांतीलाल शिंदे (वय ३७, रा. हरणवस्ती, कोपर्डी) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी मयताचे वडील कांतीलाल गोपाळ शिंदे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १ मे रोजी कोपर्डी गावात भैरवनाथाची यात्रा होती. यात्रेत तमाशात भांडणे झाली व त्यावेळी दिनेश बाबासाहेब सुद्रिक, स्वप्निल बबन सुद्रीक, वैभव मधुकर सुद्रीक या तिघांनी आपल्या मुलाला नाचण्याच्या कारणावरुन मारहाण केल्याचे आपणाला गुरुवारी गावात समजले. त्यानंतर आपण जवळच राहत असलेल्या आपल्या मुलाच्या घरी चौकशीसाठी गेलो असता तो रात्रीपासून घरी आला नसल्याचे त्याच्या पत्नीने सांगितले. थोड्यावेळाने आपला लहान मुलगा शांतीलाल याचा फोन आला व विठ्ठल स्मशानभूमीत नग्न अवस्थेत असल्याचे त्याने सांगितले. घरुन कपडे पाठवून त्याला घरी आणले. यावेळी तमाशात नाचलो म्हणून आपणास वरील तिघांनी जातीवाचक शिविगाळ करुन मारहाण केली. नंतर घरी येत असताना मारहाण करत स्मशानभूमीत नेऊन नग्ण केले. आपणाकडील कपडे, मोबाईल सगळे काढून नेले. त्यामुळे मला घरी येता आले नाही. या अपमानामुळे आपली जगण्याची इच्छा नाही, अशी हकीगत नितीनने आपणाला सांगितली. त्यावेळी आपण व जावयाने त्याची समजूत काढली.
हे देखील वाचा: काँग्रेसमध्ये राहून सर्व निष्ठा शरद पवारांप्रती वाहिल्या; विनायक देशमुखांचा बाळासाहेब थाेरातांवर हल्लाबाेल
पोलिसांनी बंदोबस्त वाढवला (Suicide)
त्यानंतर गुरुवारी दुपारी विठ्ठल हा बाबूलाल गोपाळ शिंदे यांच्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याच्या खिशात ‘माझे जीवन संपवत असून या बाबीला बंटी बाबासाहेब सुद्रीक व स्वप्निल बबन सुद्रीक कारणीभूत आहेत, असे म्हटले आहे. ही सर्व हकीगत कांतीलाल यांनी फिर्यादीत नमूद केली आहे. पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी समोर आलेल्या या प्रकरानंतर कर्जत पोलीस ठाण्यासमोर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी कोपर्डीत व कर्जतमध्ये बंदोबस्त वाढवला होता.