Suicide : पारनेर : तालुक्यातील गुणोरे येथे बुधवारी (ता.८) रात्री दोनच्या सुमारास सर्व शेजारी-पाजारी गाढ झोपेत असताना गंगाराम मानू सातपुते (वय ६०) यांनी घरासमोर पडलेल्या चिंचेच्या लाकडावरच लाकडे रचून स्वतःला जाळून (Burning) घेत आत्महत्या (Suicide) केल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. गुणोरे परिसरात या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
नक्की वाचा: भारतातील लोकशाही संकटात : पवार
सतत जाणवत होता एकटेपणा
गंगाराम हे अनेक वर्षांपासून आपल्या घरात एकटेच राहत होते. पत्नी व एका मुलाचा अकाली मृत्यू व एक मुलगा शेती कामानिमित्त बाहेरगावी असल्याने गंगाराम यांना सतत एकटेपणा जाणवत होता. तसेच मिळालेल्या माहिती नुसार त्यांना दारूचेही व्यसन होते. त्या नशेत त्यांनी स्वतःला संपविले असल्याचेही काहीजण कुजबुजत आहेत.
हे देखील वाचा: वकिलावर जीवघेणा हल्ला करणारा आरोपी गजाआड
मुलाला दिली फोनवरून माहिती (Suicide)
बुधवारी रात्री दोनच्या सुमारास अचानक घरासमोर जाळाचे लोट दिसू लागल्याने मयताचे भाऊ व त्यांची मुले बाहेर आली. त्यावेळी त्यांनी गंगाराम यांना जळत असताना पाहिल्यावर त्यांची मयत गंगाराम सातपुते यांचा मुलगा देवराम सातपुते यास फोन करून सदर घटना सांगितली. त्यावेळी जवळा येथे राहत आसलेला त्यांचा मुलगा मित्राला घेऊन धावत आला. परंतु तोपर्यंत गंगाराम अर्धवट जळून खाक झाले होते.