Suicide : सासरकडच्या त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या; सहा जणांना सक्तमजुरीची शिक्षा

Suicide : सासरकडच्या त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या; सहा जणांना सक्तमजुरीची शिक्षा

0
Suicide : सासरकडच्या त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या; सहा जणांना सक्तमजुरीची शिक्षा
Suicide : सासरकडच्या त्रासाला कंटाळून एकाची आत्महत्या; सहा जणांना सक्तमजुरीची शिक्षा


Suicide : नगर : सासरवाडीतील लोकांच्या जाचाला कंटाळून राहुरी तालुक्यातील वरवंडी येथील रोहित कचरू लांडगे याने आत्महत्या (Suicide) केली होती. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने (District and Sessions Court) सहा जणांना दोषी ठरवले. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या गुन्ह्यात (Crime) पाच वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना साध्या कैदेची शिक्षा, मानसिक त्रास होईल असे वर्तन केल्याच्या गुन्ह्यात सहा महिने सक्त मजुरी व एक हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास १५ दिवसांच्या साध्या कैदेची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता मंगेश दिवाणे यांनी काम पाहिले.

नक्की वाचा: लाच मागितल्याप्रकरणी महापालिका आयुक्तासह एक जणावर कारवाई

सासरकडच्या लोकांनी केली होती मारहाण

रोहितच्या आत्महत्येसंदर्भात त्याची आई शिवबाई कचरू लांडगे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादीत म्हटले होते की, रोहित व शिवानी यांचे लग्न झाले होते. शिवानीला नेण्यासाठी तिच्या माहेरच्या बिट्टूबाई मारुती शिनगारे, सीमा रावसाहेब बोरुडे, सतीश रावसाहेब बोरुडे, मोईन अमीर शेख, शरद राजाराम शिंदे (सर्व रा. डिग्रस, ता. राहुरी) हे १५ एप्रिल २०२१ रोजी आले होते. त्यावेळी रोहितने सतीश बोरुडे हा शिवानीला नेण्यासाठी का येतो, असे म्हणत वाद घातला. त्यातून रोहितच्या सासरकडच्या लोकांनी त्याला मारहाण केली. तसेच अपशब्द ऐकविले. त्यामुळे त्याने १६ एप्रिल २०२१ रोजी सकाळी ७.३० वाजता आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणे व मानसिक त्रास होईल असे वर्तन करण्याचा गुन्हा दाखल करून घेतला.

अवश्य वाचा: आषाढी वारीसाठी प्रशासन सज्ज, पंढरपुरात वारकऱ्यांसाठी ६५ एकर जागा आरक्षित

फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी यांची महत्त्वाची साक्ष (Suicide)

 राहुरी पोलिसांनी या प्रकरणात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ८ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात फिर्यादी, वैद्यकीय अधिकारी, तपासी अधिकारी यांची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने सर्व साक्षी पुराव्यांच्या आधारे शिक्षा सुनावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here