Suicide : माहेरी गेलेल्या पत्नीचा परत येण्यास नकार; पतीची चार मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्या

Dead body : विहिरीत आढळले तीन मृतदेह 

0
Dead body : विहिरीत आढळले तीन मृतदेह 
Dead body : विहिरीत आढळले तीन मृतदेह 

Suicide : नगर : राहाता तालुक्यातील केलवड परिसरात एकाच विहिरीत चार मृतदेह (Dead body) आढळून आले आहेत. ही घटना शनिवारी  (ता. १६) उघडकीस आली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस (Police)अग्निशामक विभागाचे (Fire Department) घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Dead body : विहिरीत आढळले तीन मृतदेह 
Dead body : विहिरीत आढळले तीन मृतदेह 

नक्की वाचा : भंडारदराला जाण्यासाठीच्या वाहतुकीत बदल

पत्नी सोडून गेल्यामुळे उचलले टोकाचे पाऊल

माहेरी गेलेल्या पत्नीचा सासरी परत येण्यास नकार. पतीचा फोन नंबरही ब्लॉक केला. तिला घायला निघालेल्या पतीने चार मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्या केली. राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे शिवरातील घटना. चिखली ता. श्रीगोंदा येथील अरुण सुनील काळे (वय ३०) याने आपली एक मुलगी व तीन मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्या केली. काळे याची पत्नी येवला तालुक्यातील माहेरी गेली होती. तिला परत आणण्यासाठी तो मुलांना घेऊन दुचाकीवरून निघाला होता. राहाताजवळ गेल्यावर त्याने पत्नीला फोन केला. मात्र तिने सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने काळे याने दारूच्या नशेत हे कृत्य केले. आज दुपारी ही घटना उघडकीस आली. त्यांची मुले अहिल्यानगर तालुक्यातील एका आश्रम शाळेत शिकत होती.

Dead body : विहिरीत आढळले तीन मृतदेह 
Dead body : विहिरीत आढळले तीन मृतदेह 

अवश्य वाचा : महाराष्ट्रात होणार १५ हजार पोलिसांची भरती

स्वतःही हात-पाय बांधून केली आत्महत्या (Suicide)

अरुण काळे याने रस्त्याच्या बाजूला आपली टू व्हीलर लावल्याचं दिसून आलं. शिवानी अरुण काळे (वय ८ ), प्रेम अरुण काळे (वय ७), वीर अरुण काळे (वय ६) आणि कबीर अरुण काळे (वय ५) अशी मयत मुलांची नावे आहेत. या चौघांना अरुण काळेने पाण्यात ढकलून दिलं. शेवटी स्वतःही हात-पाय बांधून आत्महत्या केली. अरुण काळे याने राहता तालुक्यातील कोऱ्हाळे गावच्या शिवारात हे कृत्य केलं.


विहिरीतून चौघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आलं असून अद्याप एकाचा शोध सुरू आहे. एक हात आणि एक पाय दोरीने बांधलेल्या अवस्थेत विहिरीत अरुण काळेचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे स्वतःचे हात पाय स्वतः बांधून अरुण काळेने आत्महत्या केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.