Suicide : ठेकेदाराची गळफास घेऊन आत्महत्या; अकोले तालुक्यातील गणोरे येथे घडली घटना

Suicide : ठेकेदाराची गळफास घेऊन आत्महत्या; अकोले तालुक्यातील गणोरे येथे घडली घटना

0
Suicide : ठेकेदाराची गळफास घेऊन आत्महत्या; अकोले तालुक्यातील गणोरे येथे घडली घटना
Suicide : ठेकेदाराची गळफास घेऊन आत्महत्या; अकोले तालुक्यातील गणोरे येथे घडली घटना

Suicide : अकोले : बिल्डर, ठेकेदार यांनी मला खूप त्रास दिलेला आहे, त्यात बंगल्यावाले पण आहेत. त्यांनी मला आत्महत्या करण्यास भाग पाडले. अशा आशयाची चिठ्ठी लिहून जगन्नाथ संपत कानवडे (वय ४८, ह. रा. महालक्ष्मी रोड, अकोले, मूळ रा. सावरचोळ ता. संगमनेर) या ठेकेदाराने (Contractor) गणोरे (ता. अकोले) येथे बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या मजल्यावर दोरीने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना घडली आहे.

अवश्य वाचा : हातावर सुसाईड नोट लिहित महिला डॉक्टरची आत्महत्या; प्रकरण नेमकं काय ?

अकस्मात मृत्यूची नोंद

याबाबत अकोले पोलिसांना संपत कानवडे (रा.सावरचोळ) यांनी खबर दिली असून यानुसार जगन्नाथ संपत कानवडे हे सेंट्रिंग ठेकदार म्हणून काम करत असून अकोलेतील महालक्ष्मी रोड येथे वास्तव्यास आहे. त्यांनी गुरुवारी (ता.२३) रात्री गणोरे येथे बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या खबरीवरून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

नक्की वाचा : हद्दीबाहेरील मतदारांचा समावेश होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी : आयुक्त डांगे

शवविच्छेदन होऊन सावरचोळ येथे अंत्यसंस्कार (Suicide)

सकाळी ग्रामीण रुग्णालय कोतूळ येथे शवविच्छेदन होऊन सावरचोळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, आत्महत्येवेळी सापडलेली चिठ्ठी व इतर तपास करून काही आढळल्यास इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास पोलीस निरीक्षक मोहन बोरसे यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. व्ही. जी. खाडे करत आहेत.