Sujat Ambedkar:’आम्ही राज ठाकरे यांचे भोंगे उतरवू’-सुजात आंबेडकर

0
Sujat Ambedkar:'आम्ही राज ठाकरे यांचे भोंगे उतरवू'-सुजात आंबेडकर
Sujat Ambedkar:'आम्ही राज ठाकरे यांचे भोंगे उतरवू'-सुजात आंबेडकर

Sujat Ambedkar : ‘आम्ही राज ठाकरे यांचे भोंगे उतरवू’ असं वक्तव्य सुजात आंबेडकर यांनी केले आहे. वाशिममध्ये आयोजित एका प्रचारसभेत बोलताना सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर ही सडकून टीका केली.

नक्की वाचा : दहावीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल,विषयांची संख्या वाढणार

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यातच महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात सध्या जागा वाटपावर चर्चा चालू आहे. एकीकडे या दोन्ही आघाड्यांनी निवडणुकीसाठी कंबर कसली. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने देखील दंड थोपटले आहेत. वंचितने देखील काही जागांवर आपले उमेदवार जाहीर केले असून नेते जोमाने प्रचार करत आहेत. अशातच सुजात आंबेडकरांनी राज ठाकरेंवर ही टीका केली.

अवश्य वाचा :  शरद पवारांची सुरक्षा वाढणार,झेड प्लस सुरक्षा घेण्यासाठी केंद्राचा आग्रह

सुजात आंबेडकर काय म्हणाले?(Sujat Ambedkar)

यावेळी बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले की, “मोठ्या स्पीकरवर,भोंग्यांवर हनुमान चालिसा लावले तर त्याला विरोध करण्याचं काम तसेच राज ठाकरे यांचा भोंगा उतरवण्याचे काम वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते करतील. जोपर्यंत पाच ते सहा मुस्लीम उमेदवार निवडून येणार नाहीत, तोपर्यंत मुस्लीम समाजाचं भलं कोणीही करू शकत नाही. तसेच,”काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेचे प्रस्थापित नेते आपला विकास करू शकत नाही. महाराष्ट्रात मुस्लिमांची संख्या १५ टक्के आहे. जो पक्ष आम्हाला १५ टक्के भागिदारी देईल, १५ टक्के उमेदवारी देईल, त्यालाच मुस्लीम समाज मतदान करेल,”असेही सुजात आंबेडकर म्हणाले.

विधानसभेत वंचित आघाडीची भूमिका (Sujat Ambedkar)

विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने एकला चलो रे ची भूमिका घेतली आहे. वंचितने आपल्या उमेदवारांच्या आतापर्यंत तीन याद्या जाहीर केल्या आहेत. त्यांची तिसरी यादी १६ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली. लवकरच आणखी जाही जागांवर हा पक्ष आपले उमेदवार देणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी किती जागा मिळवेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here