Sujay Vikhe : सीना पुलाचे सुजय विखे, संग्राम जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन; विरोधकांना लगावला टोला

Sujay Vikhe : सीना पुलाचे सुजय विखे, संग्राम जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन; विरोधकांना लगावला टोला

0
Sujay Vikhe : सीना पुलाचे सुजय विखे, संग्राम जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन; विरोधकांना लगावला टोला
Sujay Vikhe : सीना पुलाचे सुजय विखे, संग्राम जगताप यांच्या हस्ते भूमिपूजन; विरोधकांना लगावला टोला

Sujay Vikhe नगर : कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गावरील (National Highway) सीना नदीवर जोडरस्ते व काँक्रीट गटारसह मोठ्या पुलासाठी निधी मंजूर झाला आहे. या कामाचे भूमिपूजन समारंभ खासदार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) पाटील व आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या हस्ते आज झाले.

हे देखील वाचा : तर मराठा समाजातील लेकरं मोठ्या हुद्द्यावर दिसले असते : मनोज जरांगे

या भूमिपूजन प्रसंगी महापौर रोहिणी शेंडगे, उपमहापौर गणेश भोसले, श्याम नळकांडे, नगरसेवक धनंजय जाधव, नगरसेवक पुष्पा बोरुडे, नगरसेवक अविनाश घुले, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, सुभाष लोंढे, प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, निखिल वारे, विपुल शेटिया, विनीत पाऊलबुधे आदी उपस्थित होते.

नक्की वाचा : इंदुरीकर महाराजांना वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी जामीन मंजूर

डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, येणाऱ्या दीड वर्षात या पुलाचे काम मार्गी लागेल. राजकारण बाजूला ठेऊन जेव्हा विकास कसा साधला जातो. या बाबतचे चित्र नगरवासियांना पहायला मिळत आहे. आमदार संग्राम जगताप आणि माझ्या हातून अशी अनेकविध कामे मार्गी लागत आहेत. परंतु अनेक लोकांना आम्ही सोबत कुठे असलो की खटकते. मात्र, विकासासाठी आम्ही एकत्र काम करत आहोत, असा टोला सुजय विखे पाटील यांनी विरोधकांना लगावला.


समाजामध्ये काम करत असताना खूप लोक टीका करत असतात, पण जो समाजासाठी काम करत असतो त्याच्यामागे जनता ही ठामपणे उभी असते. त्यामुळे टीका करणाऱ्यांनी विकासकामे न करता केवळ विरोध करत रहावा आम्ही विकासकामे करत राहू. आमदार आणि खासदार यांचे विकासाचे धोरण एकच आहे. सर्वसमावेशक विकसित नगर शहर आपल्याला पाहायचे असेल तर स्थानिक प्रतिनिधींनी देखील राजकीय जोडे बाजूला ठेवून विकासकामांसाठी एकत्र यावे, असे आवाहन खासदार विखेंनी स्थानिक नेत्यांना केले.

उत्तरेत दिवाळी गोड आणि दक्षिणेत दिवाळी कडू असे वक्तव्य करणाऱ्या विरोधकांना देखील खासदार विखे यांनी खडेबोल सुनावले आहेत. मागील ३३ वर्षांमध्ये तुमच्याकडेही पदं होती, त्यावेळी दिवाळी साजरी करून लोकांना साखर का नाही वाटली? बोलणारा एक, स्क्रिप्ट लिहिणारा एक आणि वाचणारा एक; अशी सध्या विरोधकांची स्थिती झाली आहे. विखे पाटील परिवार पन्नास वर्षांपासून समाजकारणामध्ये सक्रिय आहे. अनेक त्याग करून समाजाची सेवा करण्याचे काम केले आहे आणि यापुढेही करत राहील, असे मत देखील खासदार विखेंनी मांडले.

तसेच टीका करणाऱ्यांना त्यांनी सांगितले की, उत्तर नगरमध्ये जशी दिवाळी गोड झाली तशीच दिवाळी दक्षिणमध्ये सुद्धा होईल. कारण यंदा जिल्ह्यात दोन वेळा दिवाळी साजरी होणार आहे. प्रभू श्री राम जेव्हा १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परतले तेव्हा लोकांनी दिवे लावून त्यांचे स्वागत केले आणि त्यामुळे दिवाळी साजरा झाली. ही पहिली दिवाळी आपण नुकतीच साजरी केली. परंतु यंदा दुसरी दिवाळी ही २२ जानेवारीला होणार आहे. कारण अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा संपन्न होणार आहे. या निमित्ताने नगर जिल्ह्यात दुसरी दिवाळी साजरी होईल. तेव्हा येणाऱ्या २२ जानेवारीला नगर दक्षिणेची देखील दिवाळी गोड होणार त्याची काळजी तुम्ही करू नये त्यासाठी आम्ही समर्थ आहोत असे उत्तर विरोधकांना खासदार सुजय विखेंनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here