Sujay Vikhe : क्रांतिसूर्य महात्मा फुले यांनी समाजाला खरी दिशा दिली : सुजय विखे 

Sujay Vikhe : क्रांतिसूर्य महात्मा फुले यांनी समाजाला खरी दिशा दिली : सुजय विखे 

0
Sujay Vikhe
क्रांतिसूर्य महात्मा फुले यांनी समाजाला खरी दिशा दिली : सुजय विखे 

Sujay Vikhe : नगर : क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले (Krantisurya Mahatma Jyotiba Phule) यांनी समाजाला खरी दिशा दिली, त्यांच्या सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून त्यांनी समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण (Education) पोहचवण्याचे महान कार्य केले. त्यांच्या कार्याचा महाराष्ट्राला कधीच विसर पडणार नाही, अशा शब्दांत डॉ. सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी महात्मा फुले यांच्या कार्याचा गौरव केला. 

अवश्य वाचा: मांजरीचा जीव वाचवताना विहिरीत गुदमरून पाच जणांचा मृत्यू

महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन (Sujay Vikhe)

राहुरी शहरात प्रचार दाैऱ्यानिमित्त महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना ते बोलत होते. महायुतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर मतदार संघात दौरे सुरू आहेत. लोकांच्या गाठी भेटी घेत जिल्ह्याच्या विकासासाठी आपले काय व्हिजन आहे, हे सांगत आहेत. अशाच प्रकारे राहुरी शहरात या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांच्यासह जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले आणि विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले.

हे देखील वाचा: ‘संपदा पतसंस्था’ घोटाळा प्रकरण; पाच आरोपींना जन्मठेप

सुजय विखे म्हणाले (Sujay Vikhe)

”शिक्षणाच्या प्रसार आणि प्रचारासाठी महात्मा फुलेंनी मोठे कष्ट घेत तळागळातील समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून मुख्य प्रवाहात आणले. त्यासाठी त्यांना आद्य महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी माेलाची साथ होती, असे सांगत त्यांनी सावित्री बाई यांच्या आठवणींना सुद्धा उजाळा दिला.  

डॉ. सुजय विखे पाटलांनी लोकसभा निवडुकीच्या प्रचारात आघाडी घेतली आहे. त्यांच्या सभांना लोकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विकास कामाच्या मुद्द्यावर सुजय विखे आपला प्रचार करत आहेत. नगर जिल्ह्यात त्यांच्या कारर्किदीत झालेली कामे. केवळ विकास हा आपला अजेंडा असून, येणाऱ्या काळातही जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे. जिल्ह्यात पायाभूत सुविधांच्या माध्यमातून रोजगार, आणि उद्योगधंद्यांना चालना देण्याचा त्यांचा मानस आहे. प्रचारात कोणत्याही नकारात्मक भूमिका न घेता त्यांनी आपला प्रचार चालवला असल्याने लोकांमध्ये सुद्धा त्यांची प्रतिमा उंचावत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here