Sujay Vikhe : विकासकामे लाेकांपर्यंत पाेहचवा, विराेधकांच्या भूलथापांकडे दुर्लक्ष करा; सुजय विखेंचा कार्यकर्त्यांना संदेश

Sujay Vikhe : विकासकामे लाेकांपर्यंत पाेहचवा, विराेधकांच्या भूलथापांकडे दुर्लक्ष करा; सुजय विखेंचा कार्यकर्त्यांना संदेश

0
Sujay Vikhe
Sujay Vikhe : विकासकामे लाेकांपर्यंत पाेहचवा, विराेधकांच्या भूलथापांकडे दुर्लक्ष करा; सुजय विखेंचा कार्यकर्त्यांना संदेश

Sujay Vikhe : नगर : मागील पाच वर्षात केलेली विकासकामे लोकांपर्यंत पोहचवा. निवडणुकीत (Election) विजय हा महायुतीचाच हाेणार आहे. त्यामुळे विराेधकांच्या भूलथापांकडे दुर्लक्ष करा, असा संदेश महायुतीचे (Mahayuti) उमेदवार डाॅ. सुजय विखे (Sujay Vikhe) पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला.

अवश्य वाचा : मूठभर लोकांनी स्वत:च्या फायद्याकरिता काँग्रेस पक्ष गहाण ठेवला; मंत्री विखे पाटलांचा गंभीर आराेप

श्रीगोंदे तालुक्यात कार्यकर्त्यांचा मेळावा

डॉ. सुजय विखे पाटील पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महायुतीतील घटक पक्षांना साथीला घेत डॉ. विखे पाटील यांनी लोकांशी थेट संपर्क सुरु केला आहे. विरोधकांच्या टीकेकडे दुर्लक्ष करुन केवळ मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती ते जनतेला सांगत आहेत. श्रीगोंदे तालुक्यातील पारगाव येथे झालेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात डॉ. विखे पाटील यांनी कार्यकर्ते, ‍पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते आदी उपस्थित हाेते.

हे देखील वाचा: भगवान महावीर जयंती मिरवणुकीत सर्वांनी शिस्त पाळावी : आदर्श ऋषीजी म.सा.

कामांची महिती लोकांपर्यंत पोहोचवा (Sujay Vikhe)

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामार्फत जिल्ह्यासाठी केलेल्या कामांची माहिती लोकांना द्या, त्यात कोणतेही खोटी अथवा वाढवून सांगू नका, आपण केलेली कामे अधिक असून मतदार सुज्ञ आहेत. त्यामुळे आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करून विरोधकांचा कोणताही विचार करू नये, असा संदेश सुजय विखे पाटील यांनी आपल्या कार्यकत्यांना दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here