Sujay Vikhe : नगर : लाेकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) राज्यात महायुतीच्या ४५ हून अधिक जागांवर विजय हाेणार आहे. मात्र, दुसरीकडे महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) अद्यापही जागा वाटपावरुन वाद सुरू आहेत. विकासाच्या मुद्यावर तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना पंतप्रधान करण्यासाठी सामान्य माणूस महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, असा विश्वास महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) पाटील यांनी व्यक्त केला.
हे देखील वाचा: नगर शहरात पॅलेस्टाईनचा ध्वज फडकवण्याची घटना गंभीर; मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
‘मेरा बुथ सबसे मजबूत’ (Sujay Vikhe)
पाथर्डी तालुक्यातील माळी बाभूळगाव येथील ‘मेरा बुथ सबसे मजबूत’ या कार्यक्रमात डाॅ. विखे पाटील बोलत होते. नगरमधील लोकसभेच्या प्रचाराला आता रंग चढत चालला आहे. ‘मेरा बुथ सबसे मजबूत’ कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बुथ प्रमुखांशी त्यांनी संवाद साथला. याप्रसंगी आमदार मोनीका राजळे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
नक्की वाचा: आता ईडी आणि तपास यंत्रणांची लुडबूड थांबवा; शिंदे गटाचा नेता संतापला
डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले की (Sujay Vikhe)
”राज्यात केवळ महायुतीच्याच उमेदवाराला लोकांची पसंती मिळणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रुपाने देशाला पुन्हा एकदा सक्षम आणि कर्तृत्त्ववान पंतप्रधान मिळणार आहे. त्यात महाराष्ट्राचा मोठा वाटा असणार, असा विश्वास डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे विकासाचे कोणतेही धोरण नाही, देशाचा पंतप्रधान कोण? यांचा चेहरा नाही. येत्या ४ जूनला राज्यातील महाविकास आघाडी आणि देशातील इंडीया आघाडीचा जनता दारुण पराभव करेल. कार्यकर्त्यांनी विरोधकांचा विचार न करता केवळ देशाचे पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या विकास कामांची माहिती घरोघरी पोहचविण्याचे आवाहन त्यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना केले.