Sujay Vikhe : नगर : पारनेर तालुक्यातील एका प्रचार सभेत महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) पाटील यांना पोलीस संरक्षण (Police protection) देण्यात आले. त्यावेळी ते म्हणाले, ‘मी कधीही पोलीस (Police) घेऊन फिरलो नाही. गोळी मारायची धमकी देणाराही पारनेर (Parner) तालुक्यातील आणि वाचविणारेही पारनेर तालुक्यातील आहेत’, असे त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा: घरच्या मैदानावर मुंबईचा चेन्नईकडून पराभव; रोहित शर्माची शतकी खेळी व्यर्थ
गेल्या पाच वर्षांत कधी पोलीस घेऊन फिरलो नाही (Sujay Vikhe)
पारनेर तालुक्यातील वडनेर येथे झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, “भाजपचे नेते विश्वनाथ कोरडे यांनी मला धमकी देणाऱ्या विरोधात बोलले. पंचायत समितीच्या एका माजी सदस्याने ऑडिओ क्लिप काढली. त्यावेळी मी मुंबईजवळ कामोठे येथे होतो. ऑडिओ क्लिप आल्यावर माझी अडचण झाली. कारण, मी मागील पाच वर्षांत कधी पोलीस घेऊन फिरलो नाही. माझ्या ताफ्यात एखादे पोलीस कर्मचारी असायचे मात्र, ते असायचे की नाही मला माहिती नव्हते. ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यापासून परिस्थिती बदलली आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
नक्की वाचा: साईबाबा मंदिर परिसरात ‘नो पार्किंग झोन’ घाेषित
विखे पुढे म्हणाले की (Sujay Vikhe)
आता पोलिसांनी मला तीन बंदूकधारी कॉन्टेबल दिले आहेत. त्यांना घेऊन फिरावं तर लोक म्हणतील हा माजलाय. त्यांना घेऊन फिरल नाही तर पोलिसांना निवेदन देणारे महायुतीचे कार्यकर्ते म्हणणार, आम्ही तुमच्यासाठी पोलीस संरक्षण देत आहेत. तरी तुम्ही पोलीस संरक्षण घेईना. त्यामुळे पोलिसांना सांगितले, तुम्ही माझ्या बरोबर फिरू नका. गाडीत बसून रहा. गोळीचा आवाज झाला की, मी तुम्हाला सांगतो. मग, तुम्ही या. मला पोलीस संरक्षणाची सवय नाही. काल एक बंदुकधारी कॉन्टेबल आला. मी त्यांना विचारले तुम्हाला कोणी पाठविले. त्यांनी सांगितले, एसपी साहेबांनी. त्यांना मी विचारले तुम्ही कुठले. तर त्यांनी सांगितले मी पारनेरचा. मी खूप हसलो. आपल्या नशिबात गोळी मारण्याची धमकी देणाराही पारनेरचा आणि संरक्षण देणाराही पारनेरचा, असे सांगताच सभेत एकच हशा पिकला.