Sujay Vikhe : नगर : मागील पाच वर्षात केंद्र आणि राज्य सरकारच्या (State Govt) माध्यमातून भरपूर निधी मिळाला आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही महायुतीचे (Mahayuti) उमेदवार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) पाटील यांनी दिली.
हे देखील वाचा: नीलेश लंकेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राहुल गांधी येणार
देहरे गावात प्रचारसभा
नगर येथील देहरे गावातील प्रचारसभेत ते बोलत होते. सुजय विखे पाटील आणि जिल्ह्यात आणलेला निधी आणि त्यातून झालेल्या विकास कामांच्या जोरावर मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. डॉ. विखे पाटील यांच्यासह या बैठकीला जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, देहरे गावच्या सरपंच नंदा भगत, रभाजी सूळ, अंबादास काळे, रमेश काळे, केशवराव अडसुरे, सुनील जाधव, संजय बाचकर आदी उपस्थित हाेते.
नक्की वाचा: नगर लाेकसभेसाठी पहिल्याच दिवशी २३ उमेदवारांनी नेले ४२ अर्ज
सुजय विखे म्हणाले (Sujay Vikhe)
”विकास हाच माझा अजेंडा असून त्यासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. मागील पाच वर्षात मी केलेल्या कामांचा आढावा घ्या, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची जिल्ह्यात झालेली प्रभावी अंमलबजावणी ही आपल्या जमेची बाजू आहे. शेवटच्या लाभार्थांपर्यंत योजनेचा लाभ पोहचला आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. जिल्ह्यात लवकरच तीन नव्या एमआयडीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे.”