Sujay Vikhe : माझ्याकडे विकासाची ब्लू प्रिंट, तुमच्याकडे काय?; सुजय विखेंचा विरोधकांवर घणाघात

Sujay Vikhe : माझ्याकडे विकासाची ब्लू प्रिंट, तुमच्याकडे काय?; सुजय विखेंचा विरोधकांवर घणाघात

0
Sujay Vikhe
माझ्याकडे विकासाची ब्लू प्रिंट, तुमच्याकडे काय?; सुजय विखेंचा विरोधकांवर घणाघात

Sujay Vikhe : नगर : आपल्याकडे विकासाची ब्लू प्रिंट आहे. मागील पाच वर्षात केलेली विकासकामे मतदारसंघात (Constituency) दिसत आहेत. तुमच्याकडे काय आहे. तुम्ही केलेली कामे दाखवा, मग बोलू, अशा परखड शब्दांत महायुतीचे (Mahayuti) उमेदवार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) पाटील विरोधकांचा समाचार घेतला.

हे देखील वाचा: नीलेश लंकेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राहुल गांधी येणार

सुजय विखे यांच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी रॅली (Sujay Vikhe)

राहुरी येथील एका सभेत विखे बोलत होते. नगर जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुका या दुसऱ्या टप्प्यात आल्या आहे. जिल्ह्यातील रणधुमाळीला चांगलीच रंगत चढली आहे. महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या समर्थनार्थ ठिकठिकाणी रॅली, सभा भरविल्या जात आहेत, अशाच पार्श्वभूमीवर राहुरी शहर येथे त्यांच्या समर्थनासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले आदी उपस्थित हाेते.

नक्की वाचा: नगर लाेकसभेसाठी पहिल्याच दिवशी २३ उमेदवारांनी नेले ४२ अर्ज

सुजय विखे म्हणाले (Sujay Vikhe)

”मागील महिनाभरापासून सुरू असलेल्या प्रचारात केवळ विकास कामांवर आपण चर्चा केली आहे. विरोधात कोण आहे? याचा विचार केला नसून कोणावरही टीकाटिप्पणी केली नाही. जिल्ह्याचा विकास हे एकमेव ध्येय ठेवून आपण राजकारणात आलाे आहे. जिल्ह्याच्या विकासाचे प्रश्न मार्गी लावणे, रोजगार निर्मिती करणे, महिलांचे सक्षमीकरण करणे, जिल्ह्यात विकासाच्या पायाभूत सेवा सुविधा निर्माण करणे, सक्षम जिल्हा तयार करण्यासाठी माझ्याकडे विकासाचा अजेंडा असून येणाऱ्या पाच वर्षात नगरकरांना त्याचा अनुभव येईल. विरोधकांकडे विकासाचे कोणतेही व्हिजन नाही, त्यांचे हात भ्रष्टाचाराने बरबटले आहेत. त्यांच्या दहशतीने व्यापारी हैराण झाले आहेत. सामान्य जतना वैतागली असताना केवळ आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण करू शकतात. त्यामुळे त्यांना आपण कोणतेही महत्व देत नसून विकास कामांवर चर्चा करण्याचे खुले आवाहन त्यांनी विरोधकांना दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here