Sujay Vikhe : विकासामध्ये दहा वर्ष मागे नेलेला नगर जिल्हा पाच वर्ष पुढे नेला : सुजय विखे

Sujay Vikhe : कोळगावसाठी ३३ कोटी रुपयांचा निधी विकास कामासाठी आणला असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी केले.

0
सुजय विखे

Sujay Vikhe : श्रीगोंदे : नगर जिल्हा (Nagar District) विकासाच्या बाबतीत दहा वर्ष मागे नेला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वात नगर जिल्हा विकास कामाच्या बाबतीत पाच वर्ष पुढे नेऊन ठेवला असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली चार हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रस्त्यांचे काम आज नगर जिल्ह्यात झाले आहे. योग्य लोकप्रतिनिधी जेव्हा निवडून येतो, तेव्हा त्या लोकप्रतिनिधींचा फायदा हा सर्वसामान्य जनतेला नक्की होत असतो. कोळगावसाठी (Kolgaon) ३३ कोटी रुपयांचा निधी (Fund) विकास कामासाठी आणला,असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ.सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांनी केले. कोळगाव येथे रविवारी (ता.२४) सकाळी विविध विकास कामे उद्घाटन तसेच साखर वाटप प्रसंगी ते बोलत होते. 

नक्की वाचा : घारगावमध्ये बिबट्या जेरबंद   

पुढे बोलताना डॉ. विखे यांनी सांगितले की, साकळाई योजनेसंदर्भात अनेक वर्ष राजकारण करण्यात आले. अनेकांची भाषणे झाली. मात्र आमदार बबनराव पाचपुते, शिवाजीराव कर्डिले तसेच खासदारकीच्या माध्यमातून साकळाई योजनेबाबत पाठपुरावा केल्याने साकळाई योजनेच्या सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असल्याचे सांगत जानेवारी महिन्यात प्रशासकीय मान्यता मिळवत लवकरच ते काम पूर्ण होईल,अशी हमी यावेळी ग्रामस्थांना दिली.

अवश्य वाचा : वाहतूक काेंडीचा प्रश्न मिटणार; नगर-नाशिक महामार्ग गतिमान होणार

गावच्या विकासामध्ये भर पाडायची असेल तर रस्ते झाले पाहिजे. रस्ते झाल्याने दळणवळण वाढते व गावच्या विकासाला प्रारंभ होतो. येत्या तीन ते चार महिन्यात श्रीगोंदा तालुक्यातील रस्त्याचे स्वरूप बदलून जाणार असल्याचे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पाचपुते यांनी केले. याप्रसंगी भाजप तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, माजी उपसभापती बाळासाहेब नलगे, दिनकर पंदरकर, बाळासाहेब गिरमकर, अजित जामदार,सरपंच पुरुषोत्तम लगड, माया मेहेत्रे, संतोष लगड, मधुकर लगड, अमित लगड, उपसरपंचविश्वास थोरात, तसेच सैनिक संघटनेचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here