Sujay Vikhe : नगर : नगर लाेकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Elections) ४ जूनला मतमाेजणी हाेणार आहे. याच दिवशी विकसित भारताची पायाभरणी होणार आहे. ४०० पारच्या माध्यमातून नवा इतिहास लिहला जाणार आहे, असा विश्वास महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) पाटील यांनी व्यक्त केला. २०१४ प्रमाणे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हमीची लाट सरू आहे. या लाटेत विरोधकांचा सुपडा साफ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा: आरक्षणाच्या विरोधकांना पूर्ण ताकदीने पाडा; मनोज जरांगे पाटलांचे मराठ्यांना आवाहन
घोगरगाव व देऊळगाव येथे प्रचारसभा (Sujay Vikhe)
घोगरगाव व देऊळगाव येथील प्रचार सभेत विखे बोलत होते. विखे यांनी श्रीगोंदे तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी घोगरगाव येथे सभा घेत रुईखेल, बागर्डे, तरणगव्हाण, चवरसांगवी, बनप्रिंपी, थिटे सांगवी या गावातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या सोबत युवा नेते विक्रमसिंह पाचपूते, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब महाडिक, तालुकाध्यक्ष संदीप नागवडे, अर्जून शेळके, सिद्धेश्वर देशमुख, बक्षुद्दीन शेख, राजेंद्र बेरड, घोगरगावचे सरपंच सुजाता भोसले, सुवर्णा भोसले, सचिन जगताप आदी उपस्थित हाेते.
नक्की वाचा: अबब! नगर लाेकसभा निवडणुकीच्या आखाड्यात एकाच नावाचे दाेन उमेदवार
सुजय विखे पाटील म्हणाले (Sujay Vikhe)
”२०४७ रोजी विकसित भारताचे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखविले आहेत. या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी ४ जून रोजी देशात पुन्हा भाजप आणि महायुतीचे सरकार येणार आहे. या स्वप्नाची पायाभरणी केली जाणार आहे. मागील १० वर्षातील मोदी सरकारने केलेल्या कामामुळे देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर देशवासियांचा विश्वास वाढला आहे. यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ४०० पारचा आकडा सहज गाठता येणार आहे. जिल्ह्यातही लोक नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशाचे पंतप्रधान म्हणून पाहू इच्छित आहेत. यामुळे राज्यातही महायुतीचा ४५ हून अधिक जांगावर विजय निश्चित आहे. निवडणूक अंतिम टप्प्यात असून पंतप्रधान मोदी यांचे क्रेज वाढत आहेत. तुम्ही दिलेला प्रतिसाद ही माझ्या विजयाची ग्वाही देत असल्याचे त्यांनी सांगितले.”