Sujay Vikhe : श्रीगोंदा: येथे भाजपचे (BJP) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या उपस्थितीत महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचार सांगता सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, सभा सुरू झाल्यानंतर अचानक वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू झाल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना सभेला येता न आल्याने डॉ. सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी भर पावसात उभे राहत श्रीगोंदा येथील सांगता सभा गाजविली.
हे देखील वाचा: मिशन लाेकसभा निवडणूक; प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्ज
अनेक पदाधिकारी उपस्थित (Sujay Vikhe)
यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते, विक्रम पाचपुते, बाबुशेठ टायरवाले, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा, दत्तात्रय पानसरे, डॉ.प्रतिभा पाचपुते, बाळासाहेब महाडिक, संदीप नागवडे, सुनील दरेकर, राजेंद्र उकांडे, सुभाष शिंदे, आण्णासाहेब शेलार यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
नक्की वाचा: आपल्याला शेतकरी हिताचा निर्णय घेणारा खासदार पाहिजे: सुप्रिया सुळे
लोकांनी डोक्यावर खुर्च्या घेत ऐकले भाषण (Sujay Vikhe)
डॉ. सुजय विखे यांची श्रीगोंदा येथील श्री संत शेख महंमद महाराज मंदिराच्या प्रांगणात सांगता सभा सुरू होताच दुपारी पावणे तीन वाजण्याच्या सुमारास अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह व विजाच्या कडकडाटामध्ये जोरदार अवकाळी पाऊस सूरू झाल्याने सभा मंडपात बसलेले सर्वजण भिजून गेले. मात्र, यावेळी डॉ. सुजय विखे यांनी भर पावसात जोरदार भाषण करत लोकांची मने जिंकली. डॉ. विखे यांचे भाषण सुरू असताना अनेक लोकांनी डोक्यावर खुर्च्या घेत भर पावसात भिजत उभे राहून तर काहींनी जवळपास शेड, भिंतीचा सहारा घेत सभेतील भाषण ऐकले. यावेळी भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विक्रमसिंह पाचपुते यांनी देखील भर पावसात भिजत आक्रमक भाषण केले.