Sujay Vikhe : जाती-धर्मावरुन द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी : सुजय विखे पाटील

Sujay Vikhe : जाती-धर्मावरुन द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी; सुजय विखेंचा राणेंना इशारा

0
Sujay Vikhe : जाती-धर्मावरुन द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी; सुजय विखेंचा राणेंना इशारा
Sujay Vikhe : जाती-धर्मावरुन द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी; सुजय विखेंचा राणेंना इशारा

Sujay Vikhe : नगर : अनेक वर्षांपासून आपण एकोप्याने राहतो आहे. त्यामुळे जाती धर्म पाहून आम्ही काम करत नाही. मतदारसंघात जाती धर्मावरून द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी आहे, असे माजी खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांनी भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांना नाव न घेता खेडेबोल सुनावले आहे.

नक्की वाचा: शिवरायांचा पुतळा पडण्यात राजकीय व्यक्तींची चूक नाही : कालीचरण महाराज

राणे यांना सुनावले खडेबाेल

शिर्डीतील एका साेहळ्यात विखे यांनी जातीच्या राजकारणावर भाष्य करत राणे यांना खडेबाेल सुनावले आहे. दरम्यान, भाजपचे आमदार नितेश राणे यांनी काल नगर येथे भाषणावेळी मुस्लिम समाजाबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. महंत रामगिरी महाराज यांच्या समर्थनार्थ आणि बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजातर्फे नगरमध्ये नितेश राणे यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात आला. यावेळी ते बोलत होते. दरम्यान, याच मुद्यावरून मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या प्रकरणी नितेश राणे यांच्यावर नगर येथे गुन्हा देखील दाखल झाला होता.

Sujay Vikhe : जाती-धर्मावरुन द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी; सुजय विखेंचा राणेंना इशारा
Sujay Vikhe : जाती-धर्मावरुन द्वेष पसरवला तर गाठ माझ्याशी; सुजय विखेंचा राणेंना इशारा

अवश्य वाचा : वृत्तवाहिनीवरील ईव्हीएम तपासणीबाबतचे वृत्त चुकीचे; जिल्हा निवडणूक प्रशासनाचे स्पष्टीकरण

भाजप नेते सुजय विखे पाटील म्हणाले, (Sujay Vikhe)

अशातच आता या प्रकरणात भाजप नेते सुजय विखे पाटील म्हणाले, ”हिंदू-मुस्लिम ऐक्य आहे आणि ते कायम राहिले पाहिजे. तीस वर्षात आम्ही कधीही जात विचारली नाही. मात्र, हल्ली जातीचे विष पसरवणारे लोक जनतेला आता नको झाले आहे. याच शिर्डीमध्ये साईबाबांनी सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला आणि तो संदेश आपल्याला भविष्यात देशभराला द्यायचा आहे. आज जनतेच्या गरजा महत्त्वाच्या आहेत. तो कोण आहे, कोणत्या जातीचा आहे, हे देशाच्या आणि राज्याच्या विकासासाठी महत्त्वाचं नाही, असे ते म्हणाले.”